करिना म्हणते दागिने नेले नाही, एलियाना म्हणते हल्ला व्हेक्सा ब्लेडने झाला, वाचा सगळा घटनाक्रम
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत आता वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहेत. सैफ अली खानची तब्बेत सुधारत असताना आज करीना कपूरने तिचा जबाब नोंदवला. करीनाच्या जबाबातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. हल्लेखोराने एक कोटींची मागणी गेल्याचा पुनरुच्चार करीनाने केला.

काय आहे जबाबात?
हल्लेखोर हा आक्रमक होता, असं करिनानं आपल्या जबाबात सांगितलं. शिवाय त्याने आपल्या केअरटेकरकडे एक कोटींची मागणी केल्याचेही तिचे म्हणणे आहे. मात्र चोराने घरातील कोणत्याही दागिन्यांना हात लावला नसल्याचे किंवा कोणतीही वस्तू चोरून नेली नसल्याचे करिनाने आपल्या जबाबात म्हटले आहे.
कोणी दिली तक्रार?
सैफ याच्या घरातील स्टाफ नर्स एलियामा फिलीप यांनी पोलिसांत फिर्या दिली. तिनेच पहिल्यांदा या चोराला पाहिले होते. तिच्यावर हल्लेखोराने पहिला वार केला होता. एलियामा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ती गेल्या चार वर्षांपासून सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्याकडे काम करते. सैफ याचे कुटुंब 11 व्या आणि 12 व्या माळ्यावर राहते. 11 व्या मजल्यावर तीन रूम आहेत. त्यातील एक रूम सैफ आणि करीनाची आहे. दुसऱ्या रूमध्ये तैमूर आणि त्याची देखभाल करणारी आया गीता राहते. तिसऱ्या रूमध्ये लहान मुलगा जहांगीर उर्फ जयबाबा आणि त्याच्या देखभालीसाठी एलियामा आणि जुनू राहतात.
चोराची कशी झाली एन्ट्री?
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे 15 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता तिने जहांगीरला खाऊ घातले. जुनू आणि ती खालच्या बेडवर झोपली. 16 जानेवारी रोजी भल्या पहाटे 2 वाजता, कसल्या तरी आवाजाने ती उठली. तेव्हा बाथरूमचा लाईट सुरू असल्याचे आणि दरवाजा उघडा असल्याचे तिने पाहिले. करीना कपूर मुलाला पाहायला आल्या असतील म्हणून तिने डोळे लावले. पण लगेचच बाथरूमच्या दरवाज्यावर तिला टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली दिसली. तेव्हा आपण घाबरल्याचे एलियानाने फिर्यादीत म्हटले आहे.
पैशाची मागणी
गडबडीमुळे जहागीर जागा झाला. तेव्हा हल्लेखोराने त्याच्या तोंडावर बोट ठेवले आणि नो आवाज असं म्हणाला. एलियामाने जहांगीरजवळ धाव घेतली. जुनू पण जागी झाली. तेव्हा हल्लेखोराने गडबड न करण्याची धमकी दिली. पण जुनू ही आया ओरडतच हॉलकडे पळाली. त्यामुळे सैफ आणि करीना धावतच रूमकडे आले. आरोपीने एक करोड रुपये पाहिजे, अशी मागणी केली. त्याच्या एका हातात लाकडी वस्तू तर दुसऱ्या हातात हेक्सा ब्लेड सारखी वस्तू होती. याच हत्याराने त्याने सैफ यांच्यावर हल्ला चढवला. गीता सैफ खानला वाचवायला गेली असता तिच्यावर पण त्याने हल्ला केला. सर्वांनी कशीतरी सुटका करून त्याला रूमध्ये कोंडले.
ही सर्व मंडळी लागलीच 12 व्या माळ्याकडे धावली. तोपर्यंत इतर स्टाफपैकी रमेश, रामु आणि पासवान हे धावले. त्यांनी रूम उघडली असता हल्लेखोर नव्हता. तर तातडीने सैफ यांना रिक्षाने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, असेही तिने फिर्यादीत म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications