अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू
Urmila Kothare Car Accident : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात उर्मिला कोठारे आणि कार चालक जखमी झाल्याची माहिती आहे.
उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत येत असताना मुंबईतील कांदिवली येथे हा अपघात झाला आहे. आयएएनएसने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कारचा चेंदामेंदा झाल्याचं दिसतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारची एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने उर्मिला कोठारे यांचे प्राण वाचले आहेत.

मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना भरधाव कारने धडक दिल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास सुरू करत आहेत.
मुंबई: अभिनेत्री उर्मिला कानेटकर की कार का बुरी तरह एक्सीडेंट हो गया। कार ड्राइवर ने नियंत्रण खोते हुए दो मज़दूरों को उड़ा दिया जिनमें से एक की मौत होने की खबर है तो दूसरा गंभीर रूप से घायल है। हादसे में कार ड्राइवर और एक्ट्रेस को भी चोटें आई हैं। पुलिस के मुताबिक सही समय पर… pic.twitter.com/i11ZSmeXjj
— IANS Hindi (@IANSKhabar) December 28, 2024
कोण आहे उर्मिला कोठारे?
मराठी चित्रपटसृष्टीतील उर्मिला कोठारे ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. मराठी चित्रपट 'दुनियादारी', 'शुभ मंगल सावधान', 'ती साध्या काय करते' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तीने काम केले आहे. चित्रपट दिग्गदर्शक महेश कोठारे यांचा मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे यांची त्या पत्नी आहेत.












Click it and Unblock the Notifications