Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अभिनेत्री श्रीलीलाने केलं बेबी गर्ल स्वागत, मुलीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, 'आमच्या हृदयात तुझी...

Sreeleela Motherhood News: दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला सोशल मिडीयावर चर्चेत आहे. पण यावेळेचे कारण कोणताही डान्स किंवा चित्रपट नाही तर एका गोंडस लहान मुलीचे फोटो आहेत.अलीकडेच, श्रीलीलाने तिच्या इंस्टाग्रामवर काही अतिशय गोंडस फोटो पोस्ट केले आहेत. श्रीलीलाने तिच्या कुटुंबात एका नवीन पाहुणीचे स्वागत केलं आहे.

दरम्यान अभिनेत्री श्रीलीलाने तिच्या कुटुंबात एका नवीन पाहुणीचे स्वागत केलं आहे. श्रीलीलाने एका बेबी गर्लजवळ घेत तिच्यासोबतचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रीलीलाने तिला "घरातील नवीन सदस्य" आणि "आमच्या हृदयात तुझी एंट्री झाली" असे संबोधले आहे. यापूर्वी 2022 मध्ये श्रीलीलाने दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलेलं आहे. आता तिसऱ्या मुलीच्या आगमनाने तिच्या कुटुंबात आनंदाचा माहोल आहे.

Actress sreeleela

श्रीलीलाची पोस्ट चर्चेत

शेअर केलेल्या फोटोंपैकी पहिल्या फोटोमध्ये श्रीलीला मुलीच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही हसत कॅमेऱ्याकडे पाहत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही फोटोमध्ये आनंद आणि निरागसता स्पष्टपणे दिसते. फोटोंसोबत, श्रीलीलाने पांढऱ्या रंगाचा हृदयाचा इमोजी इमोजी देखील शेअर केला आहे. या फोटोंना खूप पसंती मिळत आहे. यासोबतच, चाहते कमेंट्समध्ये दोघांनाही भरपूर प्रेम देत आहेत.

सध्या श्रीलीलाने बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले आहे. ती कार्तिक आर्यनसोबत एका रोमँटिक चित्रपटात काम करत आहे, ज्याचे नाव अद्याप जाहीर झाले नाही. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात "तू मेरी जिंदगी" हे गाणे गाताना दिसत आहे. या चित्रपटात श्रीलीलाची भूमिका खूपच महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. तिच्या बॉलिवूड डेब्यूची सर्वांनाच उत्सुकता आहे.

2022 मध्येच 2 मुले दत्तक घेतली

श्रीलीलाने 2021 मध्ये एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी पूर्ण केली आहे. श्रीलीला ती अभिनय आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी ठरली आहे. याशिवाय, ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम डान्सर आहे, आणि तिच्या डान्सकौशल्याने तिला चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख मिळवून दिली आहे. श्रीलीलाने सामाजिक कार्यातही स्वतःला झोकून दिले आहे. 2022 मध्ये तिने दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतले, ज्यामुळे तिच्या संवेदनशील आणि जबाबदार व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली. ती नेहमीच मुलांच्या कल्याणासाठी काम करते आणि अनाथालयांना भेटी देऊन त्यांना मदत करते. आता या बेबी गर्ल फोटो समोर आल्याने ती सोशल मिडीयावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+