धक्कादायक VIDEO! गार्ड धावले नसते तर...सेल्फीसाठी चाहत्यांनी अभिनेत्रीलाच ओढले गर्दीत; श्वास कोंडला
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला सध्या अनुराग बसूच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु, कार्तिक आणि श्रीलीला 'आशिकी ३' चे शूटिंग करत असल्याच्या चर्चा आहेत. कार्तिक आर्यन आणि श्रीलीला सध्या गंगटोक आणि दार्जिलिंगमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. हा चित्रपट या दिवाळीत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री श्रीलीला हिला अतिउत्साही चाहत्यांच्या त्रासाचा सामना करावा लागला. कार्तिकसोबत जात असताना अभिनेत्री श्रीलीला हिला काही चाहत्यांनी गराड्यात ओढले. तिला इतक्या गर्दीची सवय नसल्याने तिचा श्वास रोखला गेला. या घटनेचा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमके काय झाले?
कार्तीक आर्यन व श्रीलीला सध्या आशिकी-३ चे शूटींग करत आहेत. या शुटींगदरम्यान एका गर्दीतून निघतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गर्दीतील काही अतिउत्साही फॅन्स श्रीलीला हिला थेट त्यांच्याकडे ओढताना दिसत आहेत. कार्तीक आर्यन हा सुद्धा यावेळी श्रीलीलासोबत होता मात्र तो पुढे चालत होता. त्याला नेमके काय झाले, हेच समजले नाही. मात्र श्रीलीला हिला चाहत्यांनी ओढल्यानंतर तत्काळ तिच्यासोबत असणारे गार्ड धावले. यावेळी श्रीलीला हिचा काही काळ श्वास रोखला असल्याचेही सांगितले गेले.
कार्तिकवर चाहते नाराज
ही घटना घडली त्यावेळी कार्तिक आर्यन हाही श्रीलीला सोबत होता. त्याने श्रीलीला हिला वाचवायला हवे होते, असे चाहत्यांचे म्हणणे होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी कार्तिक आर्यनवर आगपाखड केली. अचानक घडलेल्या या घटनेने श्रीलीला धक्का बसला, परंतु ती तिच्या टीमशी बोलत असताना हसत राहिली. घटनेनंतर, कार्तिक मागे वळून पाहतो पण त्याला कळत नाही की त्याच्या मागे असलेल्या श्रीलीलाचे प्रत्यक्षात काय झाले. कार्तिकने श्रीलीला हिला पुढे चालायला लावायला हवे होते, असेही चाहत्यांचे म्हणणे आहे.
चाहत्यांनी केला निषेध
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच सर्व बाजूंनी कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. एका वापरकर्त्याने लिहिले की, 'सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रींना होणारी मारहाण थांबवली पाहिजे.' दुसऱ्याने लिहिले, 'खूपच भयानक... कोणासाठीही असुरक्षित.' एका वापरकर्त्याने असेही कमेंट केली की, 'हे भयानक आहे, ज्या पद्धतीने श्रीलेला ओढण्यात आले ते खूपच असुरक्षित आहे. बाउन्सर्सनी त्याला अधिक चांगले संरक्षण द्यायला हवे होते. सामान्य मुलीही इतक्या गर्दीच्या परिस्थितीत चालू शकत नाहीत, ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.












Click it and Unblock the Notifications