Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा पार्ट 3 बनणार, रश्मिका मंदान्नाने पोस्ट शेअर करत दिले 'पुष्पा 3'चे संकेत

बहूचर्चित अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट पुढील महिन्यात 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट काही काळापासून पुढे ढकलण्यात आली आहे. पुष्पा- 2 चे शेवटचे शेड्यूल 26 डिसेंबर रोजी झाले. पुष्पराज म्हणजेच अल्लू अर्जूनने स्वतः एक फोटो पोस्ट करून ही माहिती दिली होती. रश्मिका मंदान्नानेही रॅपअप पोस्ट शेअर केली आहे. येथूनच पुष्पा चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टचे संकेत मिळाले आहेत.

pushpa 2

रश्मिकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी लिहिले आहे की, "प्रिय डायरी, 25 नोव्हेंबर हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. प्रतिक्रिया कशी द्यावी हे मला अजूनही कळत नाही. पण मी तुम्हाला सर्व सांगते. आम्ही 24 नोव्हेंबर रोजी शूटिंग केले आणि नंतर चेन्नईला उड्डाण केले. इथे एका कार्यक्रमात सहभागी होऊन त्याच रात्री हैदराबादला परत आलो".

पार्ट-3 देखील बाकी

रश्मिकाने पुढे लिहिले की, "फक्त 4-5 तासांची झोप घेतल्यानंतर आम्ही घाईघाईने पुष्पाच्या शेवटच्या शेड्यूलसाठी निघालो. येथे आम्ही गाणे शूट केले. पाच वर्षांपासून हा सेट माझ्यासाठी घरासारखा आहे. आता या सेटवर माझा शेवटचा दिवस आहे. मात्र, अजूनही बरेच काम बाकी आहे. पार्ट 3 सुद्धा शिल्लक आहे, पण त्याची एक वेगळीच भावना आहे. मला खूप छान वाटत आहे. माझ्या सर्व भावना एकत्र आल्या आहेत. मी या सेटबद्दल सर्वकाही मिस करेल. खूप दिवसांनी असा अनुभव आला आहे. म्हणूनच मी अशी प्रतिक्रिया का देत आहे हे मला समजत नाही". बरं, रश्मिकाच्या या पोस्टवरून पुष्पा चित्रपटाचा पार्ट- 3 ही येणार असल्याचे समजते.दरम्यान निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहीती मिळालेली नाही.

चित्रपट 5 डिसेंबरला होणार प्रदर्शित

सुकुमार दिग्दर्शित पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती मायथ्री मूव्ही मेकर्स और सुकुमार राइटिंग्स आणि सुकुमार राइटिंग्स यांनी केली असून संगीत टी-सीरीजने दिले आहे. हा चित्रपट 5 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+