Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा बेबो करीना कपूर खान कुठे होती? पहा व्हिडीओ

Kareena Kapoor Khan: बॉलिवूड अभिनेता आणि छोटे नवाब सैफ अली खानवर काल मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास चाकू हल्लाकरण्यात आला आहे. पहाटे पाच वाजेदरम्यान त्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफवर जे 6 वार झालेत, त्यापैकी दोन वार गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

चोरट्यांनी सैफ अली खानवर चाकूने सपासप 6 वार केले आहेत. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली आहे. सैफ प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टर यांच्याकडून देण्यात आली आहे. हल्ल्याच्या काही काळापूर्वी करीना कपूर खान तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करत होती.

saif ali khan

तिची बहीण करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पार्टीत करिश्मा आणि करीनासोबत त्यांच्या जवळच्या मैत्रिणी रिया कपूर आणि सोनम कपूर देखील उपस्थित होत्या. दरम्यान हल्ल्याच्या वेळी करीना कपूर आणि तिची मुले कुठे होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सैफच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे. पण पतौडी कुटुंबाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सैफच्या टीमनेही या संपूर्ण प्रकरणावर स्टेटमेंट जारी केले आहे. या स्टेटमेंट म्हटलं आहे की, चोर रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने आत शिरले होते. यादरम्यान चोराने सैफवर हल्ला केला, त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर शस्त्रक्रिया देखील करत आहेत. या हल्ल्यात सैफचा एक कर्मचारीही जखमी झाला. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. कृपया सर्वांनी संयम ठेवा. आम्ही तुम्हाला अपडेट्स देत राहू. अशा वेळी आम्ही आमच्या चाहत्यांना आणि माध्यमांना आमचे समर्थन करण्याची विनंती , असं या स्टेटमेंट म्हटलं आहे.

या प्रकरणावर डीसीपी सीपी दीक्षित म्हणाले की, सैफ अली खान फॉर्च्यून हाइट्समध्ये राहतो. काल रात्री एक माणूस सैफच्या घरात घुसला. त्याने त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीशीही वाद घातला. तेव्हा अभिनेता तिला शांत करण्यासाठी आला तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये तो जखमी झाला. दरम्यान पोलिसांनी सैफच्या घरातून तीन जणांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले आहे.

लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी माहिती दिली की, "सैफला एकूण सहा जखमा आहेत, त्यापैकी दोन गंभीर आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ आहे आणि त्याच्या मानेवरही जखम आहे." शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व्यस्त आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन आणि भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी या डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+