काजोलवर दुःखाचा डोंगर; रोनो मुखर्जी यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा, जाणून घ्या त्यांच्याविषयी
Rono Mukherjee Death : बॉलिवूड अभिनेत्री काजोलच्या घरातून एक दुःखाची घटना समोर आली आहे. काजोल, राणी मुखर्जी आणि अयान मुखर्जी यांचे काका रोनो मुखर्जी यांचे निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण मुखर्जी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री काजोल हीचे काका रोनो मुखर्जी हे अभिनेत्री शर्बानी मुखर्जी यांचे वडील होते आणि ते एक प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक देखील होते. रोनो मुखर्जी यांनी 28 मे 2025 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
रोनो मुखर्जी ८३ वर्षांचे होते. तथापि, त्यांच्या निधनाचे कारण अद्याप कळलेले नाही. काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, रोनो मुखर्जीच्या निधनाची बातमी मिळताच, बॉलिवूड चित्रपट निर्माते अयान मुखर्जी आणि काजोलची बहीण तनिषा मुखर्जी तात्काळ त्यांच्या घरी पोहोचले. रोनो मुखर्जी यांच्या अंत्यसंस्काराला सर्वांनी हजेरी लावली आहे.
या प्रसंगी, प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर त्यांच्या पत्नी सुनीतासोबत दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष गोवारीकर यांचे लग्न अयान मुखर्जीचे वडील देब मुखर्जी यांची मुलगी सुनीता यांच्याशी झाले आहे.
रोनो मुखर्जी कोण होते? काजोल व राणीशी काय होते संबंध?
रोनो मुखर्जी हे बॉलिवूड अभिनेत्री काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांचे धाकटे भाऊ होते. सुब्बीर मुखर्जी, जॉय मुखर्जी आणि देब मुखर्जी हे देखील त्यांचे भाऊ होते. हे सर्व भारतीय चित्रपट उद्योगाचा महत्त्वाचा भाग राहिले आहेत. मुखर्जी कुटुंबातील बहुतेक लोक चित्रपट उद्योगाशी संबंधित आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी व्यतिरिक्त, श्याम मुखर्जी, गीतांजली मुखर्जी, सुभाष मुखर्जी आणि संजय मुखर्जी हे रोनो मुखर्जीचे चुलत भाऊ होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रोनो मुखर्जी यांचे भाऊ आणि अयान मुखर्जी यांचे वडील देब मुखर्जी यांचे मार्च २०२५ मध्ये निधन झाले. देब मुखर्जी हे बॉलिवूडचे एक प्रसिद्ध अभिनेते होते. रोनो मुखर्जीबद्दल बोलायचे झाले तर, ते १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तू ही मेरी जिंदगी' आणि १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हैवान' चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.












Click it and Unblock the Notifications