धक्कादायक! अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सरच निदान
मुंबई: अनेक मालिका आणि वेब शोमधून नावारुपास आलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तिला तिसऱ्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले.हिना खानने आपल्या सोशल मीडियावरून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये हिना खानने म्हटले आहे की, माझ्याबद्दल काही अफवा पसरत आहेत. मला एक महत्वाची बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करायची आहे. विशेषतः जे माझ्यावर प्रेम करतात. माझी काळजी घ्या. मला स्तनाचा कर्करोग आहे. कर्करोग तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यावर उपचार सुरू झाले आहेत.

बऱ्याच समस्यांना तोंड देत असूनही मी तुम्हा सर्वांना खात्री देते की मी ठीक आहे. या आजाराशी लढण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. यावेळी मला मानसिकदृष्ट्या बळकट ठेवेल ते करायला मी तयार आहे. माझ्यावर उपचार सुरू झाले आहेत. सर्वांच्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे.
माझ्या प्रायव्हसीचा आदर करा, हिनाचे आवाहन
पोस्टमध्ये पुढे हिना म्हणते की, मी तुमच्या प्रेमाची आणि आदराची प्रशंसा करते, परंतु अशावेळी माझ्या प्रायव्हसीची काळजी घेतली पाहिजे. मला आणि माझ्या कुटुंबाला विश्वास आहे की मी कॅन्सरची लढाई जिंकून लवकरच बरी होईन. पण तोपर्यंत थोडी काळजी घ्या. अशा कठिण प्रसंगी मला तुमच्या प्रेमाची आणि प्रार्थनांची खूप गरज आहे.
ये रिश्ता क्या कहलाता या शोमधून मिळाली प्रसिद्धी
हिना खान ही टेलिव्हिजन शो ये रिश्ता क्या कहलातामध्ये अक्षराची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. या शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारून घराघरात आपले नाव निर्माण केले. यानंतर ती बिग बॉस 11 मध्ये दिसली. हिना शोची विजेती ठरली नाही, पण बिग बॉसमुळे तिची लोकप्रियता दुप्पट झाली.
टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त, तिने वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिना खानने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.
वडिलांच्या मृत्यूचा धक्का
हिना खान तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. ती अनेकदा मुलाखतींमध्ये तिचे आई-वडील आणि भावाचा उल्लेख करताना दिसते. 2021 मध्ये तिचे वडील अस्लम खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे हिनाला मोठा धक्का बसला होता.
हिनाला कर्करोगाचे निदान झाल्याने तिच्यासाठी चाहत्यांकडून आता मोठ्याप्रमाणात प्रार्थना सुरू झाल्या आहेत. हिनाचा सोशलमीडियावर चाहता वर्ग मोठ्याप्रमाणात आहे.












Click it and Unblock the Notifications