'तु ही एका मुल्लाला जन्म दिलाय...' मुस्लिमाशी लग्न केलेल्या 'त्या' अभिनेत्रीवर युजर्स संतापले; कारण
पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. त्यात सुमारे २८ निरापराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकाराची सध्या जगभरातून निंदा होत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य हिनेही सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. शिवाय सर्व दहशतवादी आणि दहशतवादी हल्ले फक्त इस्लामिक का आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. स्वतः एका मुस्लिम कुटुंबाची सून असूनही देवोलीनाने ही पोस्ट केल्यानंतर तिच्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

काय म्हणाली देवोलीना?
देवोलीना भट्टाचार्य एका मुस्लिम कुटुंबाची सून आहे. तिने X वर एक लांब पोस्ट टाकली आहे. त्यात ती म्हणते, 'मेणबत्ती मार्च आणि ते सर्व ठीक आहे. पण स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय असे दहशतवादी हल्ले शक्य नसतात. काश्मिरी पंडितांसोबतही असेच काहीसे घडले होते. हे सर्व दहशतवादी आणि दहशतवादी हल्ले फक्त इस्लामिक का आहेत? कोणाकडे उत्तर आहे का? मला खरोखर जाणून घ्यायचे आहे. तुम्ही त्यांना काय शिकवता? त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे संगोपन झाले आहे? ते कोणत्या प्रकारचे पालक आहेत? ते काय वाचतात? ७२ हूर आणि इतर सर्व मूर्खपणावर ते का विश्वास ठेवतात. दहशतवाद्यांपेक्षाही त्यांच्या समर्थकांना जबाबदार धरले पाहिजे. त्यांना शिक्षा केली पाहिजे.
मोदी-शहांनी केली विनंती
देवोलीनाने पुढे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टॅग करून विनंती केली आहे. ती लिहिते, 'सर, कृपया मला रॅलीतील भाषण ऐकायचे नाही. कृती आवश्यक आहे आणि तीही विनाशासह. पुरे झाले. जय हिंद. देवोलीनाने आणखी बरेच ट्विट केले आहेत.
Candle March aur yeh woh sab toh theek hai. But jitna main samajhti hoon, suni hoon, without the help of locals aise terror attacks possible nahi ho paate…. Almost same happened with kasmiri pandits.
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) April 22, 2025
Accha khasa tourism chal raha tha. Toh shanti se zindagi jeena hazam nahi…
अनेकांनी केले ट्रोल
देवोलीनाला या पोस्टमुळे अनेकांनी तिला ट्रोल केले. एका वापरकर्त्याने लिहिले की, तिने स्वतः एका भावी मुल्लाला जन्म दिला आहे. दुसऱ्याने लिहिले की, हे सर्व हिंदूंवर सोडले पाहिजे. तिला आता हिंदूबाबत बोलण्याचा अधिकार नाही. एका युजरने दहशतवादी विचारसरणीच्या तुझ्या पतीने याबद्दल काहीही ट्विट का केले नाही? असा प्रश्नही केला आहे. देवोलीनाला अनेकांनी समर्थनही दिले. परंतु एकंदर या ट्विटनंतर देवोलीनाला निगेटिव्ह कमेंटचा जास्त सामना करावा लागल्याचे दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications