विक्रमच्या 'त्या' चित्रपटाचे प्रदर्शन न्यायालयाने थांबवले; चाहत्यांचा थिएटरबाहेर 'राडा', कारण काय?

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विक्रमच्या 'वीरा धीरा सूरन' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनपेक्षित विलंब झाला. त्यानंतर रामनाथपुरम मधील एका थिएटरबाहेर गोंधळ निर्माण झाला. अतिउत्साही चाहते चित्रपट पाहण्यासाठी जमले असताना, दोन गटांमध्ये अचानक हाणामारी झाली. या घटनेत एक व्यक्ती डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असताना पोलिसांनी तातडीने पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Veera Dheera Sooran screening stopped

प्रदर्शन कशामुळे लांबले

न्यायालयाच्या आदेशामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले. या प्रकाामुळे चाहते नाराज झाले आणि गोंधळ झाला. सुरुवातीला हा चित्रपट रामनाथपुरम नवीन बसस्थानकाजवळील एका थिएटरमध्ये सकाळी १०:३० वाजता प्रदर्शित होणार होता. परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे प्रदर्शन रोखण्यात आले. ज्यामुळे मोठ्या संख्येने जमलेल्या चाहत्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यातच पेरावूर गावातील एक आणि देवीपट्टिणममधील गांधी नगरमधील एक असे दोन गट ढोलताशांच्या तालावर नाचण्यात मग्न होते. या नाचगाण्यात किरकोळ हाणामारी झाली. त्याचेच पर्यावसान मोठ्या गोंधळात झाले. त्यात एकजण गंभीर जखमी झाला आणि वातावरण बिघडले.

पोलिसांनी केला हस्तक्षेप

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली. प्रेक्षकांना थिएटरमध्ये प्रवेश देण्याआधी तणाव कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांशी चर्चा केली. केनिक्कराई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत. या हिंसाचाराचे कारण तपासले जात आहे. दरम्यान, विक्रम आणि 'वीरा धीरा सूरन'च्या चाहत्यांनी चित्रपटाच्या विलंबाबद्दल निराशा व्यक्त केली.

उच्च न्यायालयाकडून प्रदर्शनावर स्थगिती

दिल्ली उच्च न्यायालयाने 'वीरा धीरा सूरन'वरील स्थगिती आणखी चार आठवड्यांसाठी वाढवली आहे. अहवालानुसार चित्रपटाचे निर्मिती संस्था एचआर पिक्चर्स कायदेशीर वाद सोडवण्यासाठी आयओवाय स्टुडिओशी चर्चा करत आहे. चित्रपटाच्या भविष्यातील प्रदर्शनाबाबत लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. ज्यामुळे प्रेक्षक बहुप्रतिक्षित चित्रपट मोठ्या पडद्यावर कधी पाहू शकतील हे स्पष्ट होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+