Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

छे छे अनुष्का शेट्टी नाहीच..! 'बाहुबली' प्रभास 'या' सुंदरीशी करतोय लग्न; तारीखही धरली?

'बाहुबली' फेम देखणा अभिनेता प्रभात लवकरच लग्न करण्याच्या तयारीत आहे. 'बाहुबली'नंतर प्रभाव व अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या अफेअरची चांगली चर्चा रंगली होती. या दोघांची जुळलेली केमिस्ट्री पाहून ते लवकरच लग्न करतील, असेही काहीजण छातीठोकपणे सांगत होते. मात्र तसं नाही... प्रभासने या सगळ्या अफवांना पूर्णविराम दिलाय. एका मिडिया हाऊसच्या बातमीनुसार प्रभास हैदराबादच्या एका श्रीमंत व्यावसायिकाच्या मुलीशी लवकरच लग्न करणार आहे.

actor Prabhas to get married

प्रभास- अनुष्काची केमिस्ट्री

तेलुगू चित्रपटांतील सुपरस्टार प्रभास त्याच्या प्रभावी अभिनयामुळे जगभरात फेमस आहे. बाहुबलीमुळे त्याच्या फॅन्स फाॅलोअर्सची संख्या लाखोने वाढली. या चित्रपटानंतर प्रभास आणि त्याची सह-कलाकार अनुष्का शेट्टीच्या अफेअरची चर्चा रंगली. या दोघांच्या जबरदस्त केमिस्ट्रीने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला होता. ज्यामुळे बाहुबली: द बिगिनिंग (२०१५) आणि बाहुबली २: द कन्क्लुजन (२०१७) हे आतापर्यंतच्या दोन सर्वात मोठ्या सिनेमॅटिक मास्टरपीस बनले आहेत. त्यांची केमिस्ट्री अशी होती की लवकरच लिंक-अपच्या अफवांना जन्म मिळाला. प्रभास आणि अनुष्का प्रेमात पडले आहेत, असे त्यांचे चाहते सांगत राहिले.

चाहत्यांचा अपेक्षाभंग

प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या लग्नाची आशा त्यांच्या चाहत्यांनी कधीच सोडली नाही. या अभिनेत्यांनी अनेकदा डेटिंगच्या अफवांना नकार दिला. तेलगू मिडिया हाऊसच्या एका बातमीनुसार प्रभासचे लग्न ठरले आहे. विशेष म्हणजे त्याची होणारी वधू अनुष्का शेट्टी नाही तर ती हैदराबादच्या एका श्रीमंत व्यावसायिकाची मुलगी असल्याचे सांगण्यात आले आहे. या बातमीत असाही दावा केला आहे की प्रभासचे काका कृष्णम राजू यांची पत्नी श्यामला देवी याच या लग्नाची तयारी करत आहेत.

कोण आहे प्रभासची पत्नी?

हैदराबादच्या एका श्रीमंत व्यावसायिकाच्या मुलीशी प्रभासचे लग्न ठरल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र ही तरुणी कोण याबाबत मात्र काहीच सांगण्यात आले नाही. फक्त प्रभासच्या घरी लग्नाची तयारी सुरु असल्याच्या चर्चा या बातमीत सांगण्यात आल्या आहेत. आता ही बातमी किती खरी व किती खोटी, हे येत्या काही दिवसांत कळेलच. मात्र, या बातमीने प्रभाव व अनुष्काच्या लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+