अभिनेता प्रवीण दबस यांचा अपघात; आयसीयूमध्ये दाखल, प्रकृती चिंताजनक
Actor Parvin Dabas in Icu : 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खोसला का घोसला' चित्रपटातील अभिनेता प्रवीण दबस शनिवारी सकाळी एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला. या अभिनेत्याला मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर येथे आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांनी अभिनेत्याच्या सर्व चाचण्या केल्या आहेत आणि त्याच्यावर आयसीयूमध्ये लक्ष ठेवले आहे. अभिनेत्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीणसोबत त्याची पत्नी प्रीती झांगियानीही रुग्णालयात आहे. प्रीती ही एक अभिनेत्री असून 'मोहब्बतें'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

प्रो पंजा लीगने निवेदन जारी केले
प्रो पंजा लीगने प्रवीणच्या अपघाताबाबत निवेदन जारी केले. अभिनेता या व्यावसायिक आर्म रेसलिंग लीगचा सह-संस्थापक देखील आहे. प्रो पंजा लीगने लिहिले की, 'हे कळविण्यात दुःख होत आहे की, प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक प्रवीण डबास सध्या वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत.
शनिवारी सकाळी झालेल्या कार अपघातानंतर त्यांना येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
शर्माजी की बेटी या चित्रपटात केले काम
कामाच्या आघाडीवर, प्रवीण शेवटचा या वर्षी रिलीज झालेल्या 'शर्माजी की बेटी' चित्रपटात दिसला होता. याशिवाय त्यांनी 'माय नेम इज खान', 'घनचक्कर' आणि 'इंदू सरकार' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रवीणने 1999 मध्ये सनी आणि बॉबी देओल स्टारर 'दिल्लगी' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. तो 'होस्टेज' आणि 'मेड इन हेवन' सारख्या वेब सीरिजमध्येही दिसला आहे.












Click it and Unblock the Notifications