बॉलिवूड अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदाच्या पायाला गोळी लागली, जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा यांच्या पायाला गोळी लागली आहे. रिव्हॉल्व्हर साफ करत असताना अचानक एक गोळी सुटून त्यांच्या पायाला लागली आहे. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. गोविंदा सकाळी कुठेतरी जाण्यासाठी निघाले असताना हा अपघात झाला. रिव्हॉल्व्हर साफ करत असताना तो चुकला, असे बोलले जात आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याच्या पायात त्याच्याच रिव्हॉल्व्हरने गोळी झाडण्यात आली. रिव्हॉल्व्हरचे लॉक उघडे असल्याने हा अपघात झाला. रिव्हॉल्व्हर साफ करत असताना अचानक एक गोळी सुटली, जी त्याच्या पायाला लागली. त्यानंतर त्यांना अंधेरीतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Actor Govinda

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीतीनुसार मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदाच्या पायात चुकून त्याच्याच रिव्हॉल्व्हरने गोळी लागल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

गोविंदाची प्रकृती स्थिर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा एका कार्यक्रमासाठी कोलकात्याला जाण्यासाठी त्याच्या घरातून निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. मात्र क्रिटी केअर रुग्णालयात उपचारानंतर त्याच्या पायातली गोळी काढण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं आहे.

गोविंदाच्या पायाला कशी लागली गोळी?

गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी एएनआयला सांगितले की, गोविंदा आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर ठेवत होते, तेव्हा त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर पडला आणि एक गोळी सुटली, जी त्याच्या पायाला लागली. डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. ते आता रुग्णालयात आहे.

पोलिसांकडून रिव्हॉल्व्हर जप्त

गोविंदाच्या गोळी प्रकरणी पोलीस घरात उपस्थित असलेल्या सदस्यांचे जबाब नोंदवणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. पोलिसांकडून अभिनेता गोविंदा यांची रिव्हॉल्व्हर आपल्या ताब्यात घेतली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+