नयनतारा विरोधात मद्रास हायकोर्टात खटला दाखल, धनुषचे अभिनेत्रीवर गंभीर आरोप
Nayanthara and Dhanush Controversy: साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. नयनताराचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. नयनतारा आणि साऊथचा प्रसिद्ध अभिनेता धनुष यांच्यात वाद काह थांबण्याचे नाव घेत नाहीये.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर नयनतारा आणि धनुष यांच्यातील कॉपीराइट उल्लंघन प्रकरणाला वेग आला आहे. जोरदार शाब्दिक युद्धानंतर धनुषच्या टीमने आता अभिनेत्री आणि तिच्या डॉक्यूमेंट्री 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' विरोधात मद्रास उच्च न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला आहे.

धनुषने नयनताराविरोधात गुन्हा दाखल केला
'लाइव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, धनुषच्या प्रोडक्शन कंपनीने नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांच्याविरोधात हा खटला दाखल केला आहे, ज्यावर हायकोर्टाने नयनताराही उत्तर देण्यास सांगितले आहे.
दरम्यान धनुषची निर्मिती कंपनी वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने नयनतारा, विघ्नेश आणि त्यांच्या राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे नाव घेतले आहे. हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, आरोपींनी परवानगी न घेता नेटफ्लिक्स डॉक्यु-ड्रामामध्ये अभिनेत्याच्या 'नानुम राउडी धन' चित्रपटातील काही दृश्यांचा वापर केला आहे.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या डॉक्युमेंट्रीवरून वाद
धनुषने 3 सेकंदाच्या व्हिडिओसाठी तिच्याकडे 10 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप अभिनेत्री नयनताराने केला आहे. तिने खुल्या पत्रात धनुषबद्दल बरंच काही सांगितलं होतं. नेटफ्लिक्सवर नयनतारावरील डॉक्युमेंट्री 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल'चा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. ही डॉक्युमेंट्री १८ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाली आहे.
नयनतारा यांना नोटीस बजावण्यात आली
या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला 3 सेकंदाचा व्हिडिओ 'नानुम राउडी धन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बनवण्यात आला होता. या चित्रपटाचा निर्माता धनुष होता. हा व्हिडिओ डॉक्युमेंट्रीत वापरल्याबद्दल नयनताराला नोटीस बजावण्यात आली आहे.
कायदेशीर नोटीसवर न्यायालयाने नयनताराकडून उत्तर मागितले
धनुषच्या कंपनीने लॉस गॅटोस प्रोडक्शन सर्व्हिसेस इंडिया एलएलपी विरुद्ध खटला दाखल करण्याची परवानगीही मागितली आहे. ज्याला उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. या कंपनीद्वारे, OTT प्लॅटफॉर्म Netflix भारतातील कंटेटमध्ये गुंतवणूक करते. लॉस गॅटोस ही मुंबईतील प्रसिद्ध कंपनी आहे. मद्रास उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेतला. या कायदेशीर नोटीसला पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने नयनताराला दिले आहेत.
नयनतारा आणि धनुष यांच्यातील अंतर
दरम्यान गेल्या आठवड्यातच नयनतारा आणि धनुष दोघेही चेन्नईमध्ये एका लग्नाला उपस्थित होते. मात्र, या काळात दोघांनीही एकमेकांकडे खूप दुर्लक्ष केले. दोघेही बोलले नाहीत आणि एकत्र बसले नाहीत.
धनुष 'नानुम राउडी धन'चा मुख्य अभिनेता आणि निर्माता
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट 'नानुम राउडी धन' मध्ये नयनतारा आणि धनुष मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन आहेत, तर या चित्रपटाचा निर्माता धनुष आहे. नयनतारा आणि विघ्नेश या चित्रपटाच्या सेटवर डेट करू लागले, त्यानंतर दोघांनी जून 2022 मध्ये लग्न केले.












Click it and Unblock the Notifications