'ऐश्वर्या रायचे उपकार मी कधीच विसरणार नाही',असं का बोलला अभिषेक बच्चन, हे आहे कारण
abhishek bachchan and aishwarya rai : बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या कपलने त्यांच्या दमदार अभिनय आणि ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांची मने दीर्घकाळ जिंकली आहेत. सध्या हे कपल चर्चेत आहे. खरे तर ऐश्वर्या आणि अभिषेक लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे दुरावलेले नाते
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे नाते अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकत्रपणे न आल्याने त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. ही उत्सुकता आणखीनच वाढली जेव्हा अभिषेकने एक सोशल मीडिया पोस्ट लाईक केली ज्यामध्ये घटस्फोटाच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली होती.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे जुने व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिषेक बच्चनने 2007 मध्ये माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायसोबत लग्न केले होते. यानंतर 2011 मध्ये या दोघांना एक सुंदर मुलगी आराध्या बच्चन झाली.
न्यूयॉर्क ट्रिप दरम्यान अभिषेकने केला होता प्रपोज
सध्या अभिषेक बच्चनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याची पत्नी ऐश्वर्या रायबद्दल बोलताना दिसत आहे. 2007 मध्ये लग्न करण्यापूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्या 2 वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर अभिषेकने न्यूयॉर्क ट्रिप दरम्यान ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केला होता.
'मी माझी पत्नी ऐश्वर्या रायकडून आत्मविश्वास वाढवायला शिकलो'
अभिषेक बच्चनने वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो पत्नी ऐश्वर्या रायकडून आत्मविश्वास वाढवायला शिकला आहे. त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता असल्याचे अभिषेकने सांगितले. अभिषेक बच्चन म्हणाला मी कुटुंबाचा लाडका मुलगा आहे. बहीण श्वेता हिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. तिचे लग्न होईपर्यंत ती माझी सुरक्षा करत असे.त्यावेळी माझ्यावर जबाबदारी नव्हती.
'ऐश्वर्या रायचे उपकार मी कधीही विसरणार नाही'
लग्न केल्यानंतर मला समजले की, आता मला एक जबाबदार व्यक्ती बनायचे आहे. मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल आणि त्यांचे संरक्षण करावे लागेल. या प्रकरणात ऐश्वर्याने मला खूप मदत केली. तिने मला जीवन साधेपणाने जगायला शिकवले. ऐश्वर्याचे उपकार मी कधीही विसरणार नाही. तिने मला आयुष्यातील अनेक सोप्या टिप्स शिकवल्या ज्या माझ्यासाठी उपयुक्त ठरत आहेत असं अभिषेकने म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications