लाडकी लेक आराध्यासाठी अभिषेकला सोडावे लागले 'हे' चित्रपट; म्हणाला- मी एका मुलीचा बाप, त्यामुळे...
Abhishek bacchan on Aaradhya : अभिनेता अभिषेक बच्चनने नुकताच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाले की, एका मुलीचा बाप आहे. त्यामुळे चित्रपटाची स्टोरी काय आहे, कोणताही बोल्ड चित्रपट किंवा सीन तर त्यात नाही ना, याचा विचार मी करतो. कारण, तो चित्रपट मला मुलीसोबत बसून पाहायला आवडते. अभिषेकच्या या विधानाने तो अधिक चर्चेत आला आहे.
सध्या, अभिषेक 'बी हॅप्पी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने एका बापाचा रोल केला आहे. जो चित्रपटातील नायक आपल्या मुलीच्या भविष्यासाठी खूप चिंतेत असतो. मुलीसाठी असलेला संघर्ष या चित्रपटात आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसंदर्भात एका मुलाखतीत त्याला चित्रपटाची कथा कशी निवडली जाते. याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

...म्हणून अभिषेकला सोडावे लागले अनेक चित्रपट
यावेळी अभिषेक म्हणाला की, मी एका लेकीचा बाप आहे. तिच्यासोबत बसून मला माझा चित्रपट पाहायला आवडेल.
मी कधीही लैंगिक आशय असलेला चित्रपट कथा किंवा भूमिका करत नाही. कोणताही सिनेमा स्वीकारण्याआधी मी त्यातील स्टोरी काय आहे, यावर चर्चा करतो. त्यानंतर मला जर ते नैतिकदृष्ट्या आवडले तरच मी ते करतो, अन्यथा मी त्याला नकार देतो. यापूर्वी मला अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या होत्या, परंतु, त्या चित्रपटाची स्टोरी मला आवडली नसल्याने मी त्याला नकार दिला.
मला बोल्ड सीन करायला आवडत नाही
अभिषेक बच्चनने त्याच्या मुलाखतीदरम्यान सांगितले की तो चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स का टाळतो. त्याच्या चित्रपटांबद्दल बोलताना तो म्हणाला की, मला चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स करायला किंवा पाहायला आवडत नाही. जेव्हा जेव्हा असे दृश्य पडद्यावर येते तेव्हा मी ते लगेच पुढे करतो.
माझ्या मुलीला मान खाली घालण्याची वेळ येऊ नये
अभिनेता म्हणाला की मी एका मुलीचा बाप आहे आणि मला ही गोष्ट चांगली समजते. माझ्या मुलीने माझा असा कोणताही चित्रपट पाहून विचित्र वाटावे असे मला कधीच वाटत नाही. मी असा कोणताही चित्रपट करणार नाही जो पाहिल्यानंतर आराध्या म्हणते की बाबा, तुम्ही काय करत आहात?
अभिषेकचा बी हॅपी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित
अभिषेक बच्चनच्या 'बी हॅप्पी' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तो १४ मार्चपासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे. २०२४ मध्ये या अभिनेत्याने फक्त एकच चित्रपट केला. शूजित सरकारचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. अभिषेक लवकरच अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांसह 'हाऊसफुल ५' मध्ये दिसणार आहे.












Click it and Unblock the Notifications