'मी अजूनही विवाहित' ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकने सोडलं मौन
Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumours: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांची चर्चा आहे. असे अनेक प्रसंग आले जेव्हा हे जोडपे एकत्र दिसले नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना अजूनच जास्त हवा मिळाली.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्याबद्दल सोशल मीडियावर सतत अफवा पसरवल्या जात आहेत की, हे जोडपे कधीही घटस्फोट घेऊ शकतात. जेव्हा अभिषेकचा हा डीपफेक व्हिडिओ समोर आला तेव्हा हे प्रकरण वाढले, ज्यामध्ये अभिनेता ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेण्याबाबत बोलत होता. या बातम्यांदरम्यान अभिषेकने आता पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.

बॉलिवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चनने म्हटलं की, मी अजूनही विवाहित आहे. अभिषेकने त्याच्या लग्नाची अंगठीही दाखवली. त्याबद्दल तुम्हा सर्वांना सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही. तुम्हा सर्वांनी या गोष्टी वाढवून सांगितल्या. अभिषेक बच्चन पुढे म्हणाला, 'ही खूप दुःखाची गोष्ट आहे. मला हे मला समजत नाही की, तुम्ही असे का करता. तुम्हाला काही स्टोरी फाईल कराव्या लागतात, हे ठीक आहे. आम्ही सेलिब्रिटी आहोत, आम्हाला ते स्वीकारावे लागेल. मला माफ करा, मी अजून विवाहित आहे. अभिषेकच्या या विधानावरून त्याचा जुना व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध होते.
अभिषेक बच्चनचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून डिलीट करण्यात आला आहे. अभिषेकचे हे विधान जुने की नवीन हे सांगणं कठीण आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्याच्या वेग-वेगळे आले. तेव्हापासून या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या. अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत तर ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत दिसली. यानंतरही असे अनेक प्रसंग आले जेव्हा ऐश्वर्या अभिषेकशिवाय दिसली.












Click it and Unblock the Notifications