जैसी माँ , वैसी बेटी!' एवढं काय झालं? का अभिषेक बच्चन असं बोलला? जाणून घ्या
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांची मने दीर्घकाळ जिंकली आहेत.मात्र सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे
काही दिवसापूर्वी मुकेश अंबानी यांचा मुलगा आनंद अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या कुटुंबीयांनी देखील हजेरी लावली होती.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन स्वतंत्रपणे आल्याने त्यांच्या नातेसंबंधाबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. सर्वांनाच काय खरे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.
अभिषेक बच्चनची जुनी पोस्ट व्हायरल
अभिषेक बच्चन यांची एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या एका जुन्या पोस्टची सोशल मीडियावर वेगाने चर्चा होत आहे. 2020 मध्ये अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर पत्नी ऐश्वर्या रायला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती.
अभिषेक बच्चनने या पोस्टमध्ये लिहिले होते, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. तू आमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल धन्यवाद. कारण हे सर्व आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अभिषेक बच्चनने पुढे लिहिले - नेहमी आनंदी राहा आणि हसत राहा. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करीन. तू आहे तशी खूप छान आहेस.
मला आराध्यासारख्या गोड मुलगी दिल्याबद्दल धन्यवाद. तसेच तिला इतक्या चांगल्या प्रकारे वाढवल्याबद्दल देखील धन्यवाद. तू वंडर वुमन आहेस आणि काहीही करू शकतेस. मला आराध्यासारखी मुलगी दिल्याबद्दल धन्यवाद. असेही त्या पोस्टमध्ये लिहिले होते.
अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक फोटो कोलाज शेअर केला होता ज्यामध्ये एका बाजूला ऐश्वर्या राय तर दुसरीकडे मुलगी आराध्या होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिषेक बच्चनने लिहिले होते,'जैसी माँ- वैसी बेटी' अशी अभिषेक बच्चन यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या ही तिच्या आईसोबत आजीच्या म्हणजेच ऐश्वर्या रायच्या आईच्या घरी राहत आहे.ती वडील अभिषेक बच्चन सोबत फारशी दिसत नाही.












Click it and Unblock the Notifications