काय सांगता ! चित्रपट फ्लॉप झाला तर आमिर खान फी घेत नाही?

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान लवकरच पुनरागमन करणार आहे. आमिर खान आता 'सितारे जमीन पर' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात आमिर खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे.

sitare zameen par release date

'सितारे जमीन पर' रिलीजसाठी सज्ज

जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट विशेष मुलांवर आधारित आहे. हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले, त्यानंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती. आमिरसोबत या चित्रपटात १० नवीन कलाकार दिसतील. याचा अर्थ असा की आमिर खान या चित्रपटातून १० नवीन कलाकारांना लाँच करत आहे.

अलिकडेच एका खाजगी वेबसाइटशी बोलताना आमिरने चित्रपटाबद्दल सांगितले. त्याने असेही सांगितले की जेव्हा जेव्हा त्याचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतो तेव्हा तो त्याची फी घेत नाही. गेल्या वेळी आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या अपयशी ठरला होता.

आमिर म्हणाला- मी माझा पगार नफ्यातून घेतो. जर चित्रपटाला नफा झाला नाही तर मी माझे पैसे घेत नाही. जसे 'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप झाला तेव्हा मी पैसे घेतले नाहीत. आणि मला या गोष्टीचा कोणताही पश्चात्ताप नाही. हा अगदी बरोबर नियम आहे. जर माझा चित्रपट अयशस्वी झाला तर त्याची जबाबदारी मी घेतली पाहिजे. हे माझे विचार आहेत असं आमिरनं म्हटलं होतं.

आमिरने आपला शब्द पाळला

आमिर पुढे म्हणतो की, "आता जर मी तुम्हाला हे सांगत आहे आणि निर्माते माझे ऐकून प्रत्येक अभिनेत्याला हे लागू करू लागले तर ते चुकीचे ठरेल. कारण प्रत्येक व्यक्ती त्याच्या पद्धतीने काम करते आणि प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विचारसरणी असते. जेव्हा मी काम करतो तेव्हा मला असे वाटत नाही की मी 60 दिवस काम करत आहे, म्हणून तुम्ही मला इतके पैसे देता. ते माझे विचार नाहीत. काही लोक असे विचार करतात. ते खूप व्यावसायिकपणे काम करतात की मी इतक्या दिवसांसाठी येत आहे, तुम्ही मला इतके पैसे देता. मग ते गेले की नाही, आम्हाला काही फरक पडत नाही असही आमिरनं म्हटलं आहे.

"मी हे सांगून कोणावरही टीका करत नाहीये. मी फक्त माझी जबाबदारी घेत आहे. प्रेक्षक मला पाहण्यासाठी येत आहेत, मला माझ्या कामाचे समर्थन करावे लागेल, हे माझ्या मनात आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+