60 व्या वर्षी 'गजनी' प्रेमात; नव्या प्रेयसीसोबत आमीर खान 'असा' दिसला, व्हिडीओ पाहून चाहतेही चकीत
आपल्या भुमिकेशी समरस होणारा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तीक आयुष्याबाबत चांगलाच चर्चेत आला आहे. आमिर खान नुकताच ६० वर्षांचा झाला. आपल्या वाढदिवशी त्याने खुलासा केला होता की, तो बेंगळुरूच्या गौरी स्प्राटला डेट करत आहे. या खुलाशानंतर अमिरच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता त्याच्या वक्तव्याला नुकतीच पुष्टी मिळाली आहे. पहिल्यांदाच आमिर खान आपल्या नव्या प्रेयसी गौरीसोबत एका कार्यक्रमात दिसला. हातात हात धरुन चालताना या दोघांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

कोण आहे आमीरची प्रेयसी?
आमिर खानने गेल्या महिन्यात त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याच्या नव्या प्रेमाची कबुली दिली. गौरी स्प्रेटला डेट करत असल्याचे त्याने उघड केले. दोघेही पहिल्यांदाच मुंबईत एकत्र दिसले. गौरीच्या वाढदिवसानिमित्त माध्यमांना तिची ओळख करून देताना तो म्हणाला- 'तुम्हा सर्वांशी तिची ओळख करून देण्याची ही एक चांगली संधी आहे असे मला वाटले. मग आपल्याला लपूनही राहावे लागणार नाही. ती बंगळुरूची आहे आणि आम्ही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतो. ती मुंबईत होती आणि आम्ही योगायोगाने भेटलो. आम्ही संपर्कात राहिलो आणि आता आम्ही एकत्र आहोत. हे सर्व योगायोगाने स्वतःहून घडले, असे आमीरने सांगितले होते.
AamirKhan in Macao just now!!!#aamirkhan pic.twitter.com/iAa7A2nNL5
— 𝓙𝓾𝓵𝓵𝓮𝓸𝓿𝓸 (@ITSS_ALLGOODMAN) April 12, 2025
आता दिसले हातात हात घालून
आमीर खान मकाऊ आंतरराष्ट्रीय कॉमेडी महोत्सवात सहभागी झाला होता. तिथे गौरी देखील त्याच्यासोबत होती. आमीरने काळ्या कुर्ता-पायजमा घातला होता आणि सोनेरी शालने त्याचा लूक पूर्ण केला होता. तर गौरी स्प्राटने फ्लोरल प्रिंट साडी घातली होती. गौरी साडीत खूपच सुंदर दिसत होती. गौरी आणि आमिरसोबत अभिनेते शेन टेंग आणि मा ली देखील उपस्थित होते.
दोघांनी दिली एकत्र पोज
कार्यक्रमात प्रवेश करताच या जोडप्याने एक भन्नाट पोज दिली. लग्नासाठी हात मागत असल्यासारखा त्याने गौरीसमोर हात पुढे केला. नंतर गौरीनेही त्याच्या हातात हात दिला. यानंतर दोघांनीही एकत्र पोज दिली. गौरी आणि आमिर हातात हात घालून चालत असतानाचा आणि एकत्र पोज देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनाही त्यांची प्रतिक्रिया देण्यापासून रोखता आले नाही. अनेकांनी अगदी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications