काही महिन्यांपूर्वी पत्नीसोबत घटस्फोट, तर आज AR रहमान यांची प्रकृती बिघडली, वाचा नेमकं काय झालंय?
ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ए.आर. रहमान यांची प्रकृती अचानक बिघडली आहे, त्यामुळे त्यांना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेहमान डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून एआर रहमान हे चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे फॅमिलीमघ्ये निर्माण झालेला वाद, चला तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी सर्व काही..!
ए.आर. रहमान यांना नेमकं काय झालंय?
एआर रहमान यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रहमान यांचा अँजिओग्राफी केली जाणार आहे.

तथापि, त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. पण रहमानला रुग्णालयात दाखल केल्याच्या बातमीने त्याचे सर्व चाहते चिंतेत पडले आहेत आणि ते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच तुटला होता संसार
काही महिन्यांपूर्वीच संगीतविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. ज्येष्ठ संगीतकार एआर रहमान यांचा संसार तुटला होता. त्यांच्या पत्नी सायरा रहमान यांनी पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. सायरा यांच्या वकील वंदना शाह यांनी या दाम्पत्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत अधिकृत निवेदन जारी केले होते.
काय म्हटले निवेदनात?
वकील वंदना शाह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, कित्येक वर्षाच्या संसाराला आम्ही आता थांबवत आहोत. पती ए.आर. रहमान यांच्यापासून वेगळे होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या नात्यातील महत्त्वपूर्ण भावनिक तणावाचा काळ आहे. एकमेकांवर त्यांचे नितांत प्रेम असूनही, या जोडप्याला असे आढळून आले आहे की तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण झालेली आहे. जी यावेळी कोणत्याही परिस्थितीत भरून काढता येणार नाही, असा दावा त्या निवेदनात केला गेला होता.
रहमान यांचे कधी झाले लग्न?
ख्यातनाम संगीतकार एआर रहमान यांचे 1995 मध्ये लग्न झाले होते. त्यांना तीन पाल्य आहेत. त्यांचे नाव खतिजा, रहीमा आणि आमीन अशी आहेत.एआर रहमान यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर रहमानचा यांचा शेवटचा प्रोजेक्ट धनुषचा दुसरा दिग्दर्शकीय उपक्रम, रयन यामध्ये त्यांनी संगीत दिले. तर आगामी छावा, ठग लाइफ, गांधी टॉक्स आणि इतर चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. तर काही चित्रपटांच्या संगीतावर त्यांचे काम चालू आहे.
एआर रेहमान यांची संपत्ती किती?
ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान गणना सर्वाधिक कमाई करणाऱ्या संगीतकारांमध्ये होते आणि त्यांची एकूण संपत्ती 1700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.












Click it and Unblock the Notifications