Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अखेर रणबीर अलाहाबादीया विरोधात FIR दाखल; मुख्यमंत्र्‍यांनीही घेतली दखल, वाचा नेमकं प्रकरण काय?

'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमधील एका असभ्य टिपण्णीबद्दल लोकप्रिय यू-ट्यूबर रणवीर अलाहाबादीया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, समय रैना आणि आयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कुटुंबाबद्दल केलेल्या कथित अश्लील आणि वादग्रस्त टिप्पणीनंतर ही तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमके काय, काय झाले होते, ते आपण पाहूयात...

Ranveer Allahabadia

नेमके काय आहे प्रकरण?

स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो नेहमीच चर्चेत असतो. या शोमधून कधीकधी येथील लोकांना वादग्रस्त प्रश्न विचारले जात असल्याने या शोची चर्चाही होते. नुक्त्यात झालेल्या शोमध्ये मात्र सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्याच्या दिसल्या. शोच्या या भागात युट्यूबर्स आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा, रणवीर अल्लाहबादिया सहभागी झाले होते. शोमध्ये रणवीर इलाहाबादियाने प्रेक्षकांना त्याच्या पालकांबद्दल असा प्रश्न विचारला की त्याच्यावर खूप टीका होत आहे. सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे आणि आता त्याच्याविरुद्ध तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

नेमका काय होता अश्लील प्रश्न?

या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अश्लील, विवादास्पद प्रश्न विचारला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. रणवीर अलाहाबादियाने शोमधील एका स्पर्धकाला विचारले, "तुम्ही तुमच्या पालकांना आयुष्यभर दररोज इंटिमेट होताना पाहाल का किंवा एकदाच सहभागी होऊन ते कायमचे थांबवाल का?" असा भयानक प्रश्न त्याने विचारला. इंग्रजीत विचारण्यात आलेल्या या प्रश्नाची ओळ अशी होती - "Would you rather watch your parents have sex for the rest of your life - or would you join in once and stop it forever?" त्याच्या या अतिशय असभ्य प्रश्नावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. मात्र यावर रणवीरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आरोपींवर कारवाईची मागणी

एएनआयच्या एका वृत्तानुसार यूट्यूबर रणवीर इलाहाबादिया, सोशल मीडिया प्रभावक अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. शोमध्ये अपशब्द वापरल्याबद्दल मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना दिलेल्या पत्रात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

इंडिया गॉट टैलेंट शो मध्ये झालेल्या वादग्रस्त वक्तव्याची पोलीस चौकशी सुरू झाली आहे. लाईव्ह शो दरम्यान केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांचे पथक हॅबीटैटच्या कार्यालयात पोहोचले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांनीही या वक्तव्याची दखल घेतली आहे. काही गोष्टी असंस्कृत पद्धतीने हाताळल्या गेल्या आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते. हे योग्य नाही, प्रत्येकाला मर्यादा असतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

रणवीर इलाहाबादिया कोण आहे?

रणवीर हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याला भारतातील सर्वोत्तम YouTube पुरस्कार आणि सर्वात स्टायलिश उद्योजक प्रभावशाली पुरस्कार मिळाला आहे. रणवीर इलाहाबादिया यांनी बॉलिवूड, हॉलिवूड स्टार, ज्योतिषी इत्यादी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. रणवीर नेहमीच त्याच्या पॉडकास्ट, स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. रणवीर 'बेअर बायसेप्स' नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवतो. रिपोर्ट्सनुसार, रणवीर यूट्यूब आणि पॉडकास्टमधून दरमहा सुमारे ३५ लाख रुपये कमावतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+