'छावा'च्या दिग्दर्शकाचा मोठा निर्णय; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर म्हणाले, आता यापुढे...
'छावा' या चित्रपटातील लेझीम नृत्याच्या दृश्यावरून सध्या वाद सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला. शिवाय संभाजीराजांचा दैदीप्यमान इतिहास दाखविण्याचा आमचा हेतू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

काय होता वाद
या चित्रपटात एक संभाजी राजांवर चित्रित केलेले गाणे आहे. त्यात राजे लेझीमवर नृत्य करताना दाखविले आहेत. या दृष्यावरुन सध्या चांगलंच वातावरण तापलेलं दिसत आहे. अनेक शिवप्रेमींनी या गाण्यावर हरकत घेतली आहे. राजांना लेझीम नृत्य करताना दाखवू नये, असे काहींचे म्हणणे आहे. यावरुन वेगवेगळ्य प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आज सकाळी मंत्री उदय सामंत यांनी हे गाणे चित्रपटात दिसणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली.
काय म्हणाले दिग्दर्शक
उतेकर म्हणाले, "आम्हाला राजसाहेबांचा सल्ला हवा होता. त्यांचं इतिहासाच वाचन दांडगं आहे. महाराजांबद्दल त्यांचं खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमके काय बदल करायला हवेत, हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. चर्चेदरम्यान त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत. त्या खूप महत्त्वपूर्ण आणि चांगल्या सूचना आहेत. त्यांनी खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केलं, असं दिग्दर्शकाने सांगितलं.
गाणं डिलिट करणार
यावेळी चित्रपटातील वादग्रस्त सीन काढण्याबद्दल त्यांनी सांगितलं, "चित्रपटातील लेझीम नृत्याचे सीन्स आम्ही डिलिट करणार आहोत. राज ठाकरेंनीही मला तोच सल्ला दिला. त्या सीनमध्ये आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण त्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचले नसतील, तर तो सीन आम्ही काढून टाकू.
चार वर्षांची मेहनत
आपल्या चित्रपटाबाबत बोलताना उतेकर म्हणाले की, "या चित्रपटाबाबत आम्ही इतिहासकारांबद्दल चर्चा करणार आहोत आणि स्क्रिनिंगचंही आयोजन करण्यात आलं आहे. मला फक्त एवढंच कळकळीनं सांगायचं आहे की आमची संपूर्ण टीम गेली चार वर्षे यावर रिसर्च करतेय आणि एवढा मोठा चित्रपट बनवण्यामागचं कारण हेच आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे संपूर्ण जगाला कळू दे.












Click it and Unblock the Notifications