Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऑस्कर 2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे, वाचा संपूर्ण यादी अन् कसे मिळाले नामांकन

'ऑस्कर' हा चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा असा पुरस्कार समजला जातो. यावर्षीच्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. तत्पूर्वीच भारतातील कोणत्या चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळाले याची यादी समोर आली आहे. नामांकनाची यादी नुकतीच समोर आली आहे. चला बघूया कोणते चित्रपट आहेत ते.

जगभरातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यासाठी अनेक भारतीय चित्रपटांना देखील नामांकन मिळाले आहे. गेल्या वर्षी 'लापता लेडीज' चे नाव ऑस्कर पुरस्काराच्या नॉमिनेशनसाठी समोर आले होते. मात्र हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

Oscar 2025

अशातच आता या वर्षी काही चित्रपटांची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांचा सहभाग असलेला दिसून येत आहे. आता 97 व्या ऑस्कर सोहळ्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टारचा एक बहूचर्चित चित्रपटाचे नाव येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे. दाक्षिणात्य चित्रपटाच्या ट्रेड अनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर 'कंगुवा'च्या ऑस्कर एंट्रीबद्दल माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये अकादमी पुरस्काराची एक सूची जारी केली आहे. यामध्ये 'कंगुवा'चा देखील समावेश आहे. सर्वोकृष्ट फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये 'कंगुवा'चा समावेश आहे.

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा इथे पार पडणार?

यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे ९७ वे वर्ष आहे. हा पुरस्कार सोहळा २ मार्च २०२५ रोजी लॉस एंजलिस मध्ये आयोजित केला आहे. यावेळी ऑस्करसाठी अनेक भाषांमधील चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. त्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा चित्रपट 'कंगुवा'चे नाव समोर येत आहे. तसेच या व्यतिरिक्त अजून पाच चित्रपटांचाही समावेश दिसून येत आहे.

नामांकन असलेले 5 चित्रपट कोणते ते पाहूया!

ऑस्कर २०२५ मध्ये 'कंगुवा'सोबतच 'द गोट लाईफ', 'स्वातंत्र्य वीर सावरकर', 'ऑल वी इमॅजीन इज लाइट', 'गर्ल्स विल बी गर्ल्स' व 'अनुजा' या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 'लापता लेडीज' या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली होती. पण हा बॉलीवूड मधील सिनेमा ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे.

मतदानाच्या आधारे चित्रपटांना अंतिम नामांकन मिळेल

निवडलेल्या सर्व 232 चित्रपटांमध्ये मतदान केले जाईल, त्यानंतर त्यांना ऑस्कर 2025 मध्ये अंतिम नामांकन मिळेल. मतदान 8 जानेवारीपासून सुरू होणार असून 12 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यानंतर, नामांकित चित्रपटांची अंतिम यादी 17 जानेवारी रोजी ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चरद्वारे प्रसिद्ध केली जाईल.

ऑस्करच्या शर्यतीतून लापता लेडीज वगळण्यात आला

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपटही ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता, मात्र अंतिम निवडलेल्या चित्रपटांच्या यादीतून हा चित्रपट वगळण्यात आला आहे.

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण ऑस्करपर्यंत कांगुवा पोहोचला

350 कोटींच्या बिग बजेटमध्ये बनलेला कांगुवा हा चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 100 कोटींची कमाई करू शकला. या चित्रपटात सूर्या, दिशा पटानी, बॉबी देओल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+