बॅंकिंगची तयारी करणाऱ्या युवकांसाठी गुड न्यूज; 'या' बॅंकेत निघाली 500 ऑफिसरची भरती, कसा करणार अर्ज?
Union Bank SO Recruitment 2025 : बॅंकिंगची तयारी करणाऱ्या युवकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, युनियन बँकेच्या वतीने तब्बल 500 जागांची भरती काढण्यात आली आहे.
स्पेशल ऑफिसर पदाच्या 500 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. पात्र उमेदवार युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे. चला तर अर्ज कसा करायचा, काय निकष आहेत, फी किती आहे, याविषयी सर्व काही जाणून घेऊया..!

रिक्त पदांची माहिती
- सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट): २५० पदे
- सहाय्यक व्यवस्थापक (आयटी): २५० पदे
पात्रता निकष
सहाय्यक व्यवस्थापक क्रेडिट व सहाय्यक व्यवस्थापक आयटी या दोन्ही मिळून 500 पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार येथे उपलब्ध असलेल्या तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात. त्यासाठी तुम्ही unionbankofindia.co.in या बेवसाईडला नक्की भेट द्या. प्रामुख्याने या पदासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा/ गट चर्चा (जर घेतली गेली असेल तर)/ अर्जांची छाननी आणि/ किंवा अर्जदारांच्या / पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असणार आहे.
अधिसूचित पदांसाठी निवडीसाठी यापैकी सर्व किंवा कोणत्याही पद्धती वापरायच्या की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार बँकेकडे असतील.
परीक्षेची संरचना कशी असणार
ऑनलाइन परीक्षेत पदाशी संबंधित क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्रजी भाषा आणि व्यावसायिक ज्ञान या विषयावरील प्रश्न असतील. इंग्रजी भाषेची चाचणी वगळता वरील चाचण्या द्विभाषिक म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असतील.
अर्ज शुल्क किती लागणार?
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹177/- (GST समाविष्ट) आहे. तर इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी, अर्ज शुल्क ₹1180/- (GST समाविष्ट) आहे.
डेबिट कार्ड (RuPay/Visa/MasterCard/Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट्स/UPI वापरून पेमेंट करता येते. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.












Click it and Unblock the Notifications