Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

SSC GD Constable Result: एसएससी जीडी कॉन्स्टेबलचा निकाल लवकरच, कसा चेक करायचा, जाणून घ्या

How to Check SSC GD Constable Result 2025 : एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2025 चा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/शारीरिक मानक चाचणी (PST) आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे.

नेमका कधी लागणार निकाल?

स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSC च्या वतीने घेतली गेलेली GD कॉन्स्टेबल 2025 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टाफ सिलेक्शन बोर्ड देखील त्यासाठी सज्ज झालेले आहे. निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. एकदा ते प्रसिद्ध झाल्यानंतर, परीक्षेला बसलेले उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. उमेदवार या वेबसाइटवरून निकाल PDF डाउनलोड करू शकतील, ज्यामध्ये गुणवत्ता यादी आणि श्रेणीनिहाय कटऑफ इत्यादींचा देखील समावेश असणार आहे.

ssc gd constable result 2025

या कालावधीत पार पडली होती परीक्षा!

एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावरील भरती परीक्षा आहे. जी भारतातील विविध केंद्रांवर संगणकीय पद्धतीने घेतली जाईल. या वर्षी ही परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घेण्यात आली आणि त्याची तात्पुरती उत्तरपत्रिका 4 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. एसएससी जीडी कॉन्स्टेबल निवड प्रक्रियेत तीन मुख्य टप्पे असतात, लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी/शारीरिक मानक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना PET/PST फेरीत बसावे लागेल.

निकाल कसा पाहू शकतो?

  • सर्वप्रथम SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जा.
  • त्यानंतर होमपेजवरील रिझल्ट टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर निकाल विभागातील परीक्षा श्रेणीतून 'कॉन्स्टेबल जीडी' निवडा.
  • आता 'एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा निकाल 2025' ही लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर निकालाची PDF उघडेल ज्यामध्ये पात्र उमेदवारांचे रोल नंबर आणि कट-ऑफ गुण यासारखे तपशील असतील.
  • पीडीएफ डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी ती सुरक्षित ठेवा.

श्रेणीनुसार अपेक्षित कटऑफ कसा लागू शकतो?

  • सामान्य (UR): 145 ते 155 दरम्यान.
  • ओबीसी : 135 ते 145 दरम्यान.
  • EWS: 138 ते 148 दरम्यान
  • एससी: 130 ते 140 दरम्यान
  • एसटी: 120 ते 130 दरम्यान
  • ईएसएम (माजी सैनिक): 60 ते 70 दरम्यान

किती पदांसाठी होणार भरती?

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेद्वारे, सीएपीएफ, एसएसएफमध्ये कॉन्स्टेबल (जीडी), आसाम रायफल्समध्ये रायफलमन (जीडी) आणि एनसीबीमध्ये शिपाई या पदांसाठी एकूण 53,690 पदांची भरती केली जाईल. सुरुवातीला 39,481 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. ज्यामध्ये नंतर आणखी पदे जोडण्यात आली, ज्यामुळे पदांची संख्या 53 हजारांहून अधिक झाली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+