Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

SBI PO Result 2025 : एसबीआय प्रोबेशनरी ऑफीसर परिक्षेचा निकाल लवकरच लागणार! sbi.co.in वर येईल अपडेट्स

SBI PO results 2025 : नोकर भरतीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लवकरच प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या प्राथमिक परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करणार आहे. एसबीआयने जाहीरात क्रमांक CRPD/PO/2024-25/22 अंतर्गत या परिक्षेचे आयोजन केले होते. आता उमेदवारांना त्यांच्या निकालाची प्रतिक्षा आहे.

विशेष म्हणजे निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून डाउनलोड करू शकतात.

SBI PO results 2025 likely soon at sbi co in

600 रिक्त पदांसाठी परीक्षा

या भरतीत 600 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. एकूण तीन फेज आहेत. पहिल्या फेजमध्ये अर्थात टेंटीटीव्ह एक्झाम 8, 16 आणि 24 मार्च 2025 रोजी घेण्यात आली होती.

फेज दोन आणि तीनसाठी कधी आहेत परिक्षा?

फेज II (मुख्य परीक्षा) असून फेज III मध्ये (सायकोमेट्रिक चाचणी) आहे. या तीन टप्प्यातून उमेदवारांना जावे लागणार आहे दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यांसाठी अनुक्रमे एप्रिल/मे 2025 आणि मे/जून 2025 मध्ये ही चाचणी आयोजित करण्यात येणार आहेत.

असा करा SBI PO प्रीलिम्स निकाल 2025 डाउनलोड

  • SBI PO प्रीलिम्स निकाल 2025 डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
  • होमपेजवर, SBI PO प्रीलिम्स निकाल लिंकवर जा.
  • तुमचे लॉगिन तपशील कळवा आणि सबमिट करा.
  • तुमचा निकाल तपासा आणि डाऊनलोड करा
  • भविष्यातील संदर्भासाठी तुम्हाला प्रिंट ही असेल तर ती तुम्ही घेऊ शकता अथवा स्क्रीन शाॅटही घेता येईल.

जर यापेक्षा अधिक माहिती आगामी परिक्षेची तारीख, वेळ आणि मार्गदर्शक सूचना तसेच अधिक तपशील आपल्याला हवा आहे, असे वाटल्यास उमेदवारांनी एसबीआयच्या परिक्षेसंदर्भातील अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+