एसबीआय क्लार्क प्रिलिम्सचा निकाल कधी जाहीर होणार ? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
sbi clerk prelims Result 2025 : एसबीआय क्लर्क प्रिलिम्स परीक्षेच्या अधिकृत निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक लवकरच क्लर्क/ज्युनियर असोसिएट्स पदांसाठीच्या प्रिलिम्स परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करू शकते. या परीक्षा दिलेल्या उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर त्यांचे निकाल पाहू शकतील. निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन डिटेल्स टाकून निकाल पाहता येईल.
प्रिलिम्स परीक्षा कधी झाली?
एसबीआय क्लार्कची पूर्व परीक्षा 22, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी घेण्यात आली. ही परीक्षा एकूण 100 गुणांची होती. त्यासाठी एक तास देण्यात आला होता. प्रश्नपत्रिकेत इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता असे तीन विभाग होते. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग देखील होते, म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नासाठी दिलेल्या गुणांपैकी एक चतुर्थांश गुण वजा केले जात होते. या भरती मोहिमेद्वारे एसबीआयने एकूण 13,735 ज्युनियर असोसिएट पदे भरण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

एसबीआय क्लार्क प्रिलिम्सचा निकाल कसा तपासायचा?
- सर्वप्रथम तुम्हाला SBI ची अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला होमपेजवर उपलब्ध असलेल्या करिअर लिंकवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर SBI क्लर्क प्रिलिम्स निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
-त्यानंतर तुम्हाला लॉगिन डिटेल्स माहिती द्या आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल.
-तुमचा निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा.
- भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे काढून ठेवा.
मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र कधी जारी केले जाईल?
एसबीआय क्लर्क प्राथमिक परीक्षेच्या निकालासह मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करतील. अधिकृत वेबसाइटवर म्हटलं आहे की 'मुख्य परीक्षेची संभाव्य तारीख 10 एप्रिल 2025 आहे. पूर्व परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना कॉल लेटर प्राथमिक परीक्षेच्या निकालासह दिले जातील. हा भरती प्रक्रियेचा हा पहिला टप्पा होता, त्यात यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढील टप्प्यात सहभागी होऊ शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार परीक्षेचा निकाल 31 मार्च 2025 पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो.
कट-ऑफ आणि मेरिट लिस्ट
दरम्यान निकालासोबतच, एसबीआय राज्यनिहाय आणि श्रेणीनिहाय कट-ऑफ गुण देखील जाहीर करू शकते. हे कट-ऑफ गुण उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी आवश्यक असलेले किमान पात्रता गुण निश्चित करतात. प्रिलिम्स परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे असलेली गुणवत्ता यादी देखील प्रकाशित केली जाईल.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications