SBI Clerk Vacancy 2025 : एसबीआयमध्ये क्लर्क पदाची मेगाभरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रियेविषयी!
sbi clerk notification 2025 : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्लर्क (ज्युनियर असोसिएट - कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदासाठी 6559 रिक्त जागांची घोषणा केली आहे. या भरतीसाठीची अधिकृत अधिसूचना 5 ऑगस्ट 2025 रोजी बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशभरातील विविध शाखांमध्ये ही भरती होणार असल्याने, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
अर्ज कधी करायचा?
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया, 6 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या वेळेतच अर्ज करणे आवश्यक आहे.

पात्रता आणि अटी
1. शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
- जे उमेदवार अंतिम वर्षात आहेत आणि ज्यांची पदवी कट-ऑफ तारखेपर्यंत पूर्ण होईल, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना पदवी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
2. वयोमर्यादा :
- उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2025 रोजी 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.
- शासनाच्या नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सूट देण्यात आली आहे:
- एससी/एसटी: 5 वर्षांची सूट
- ओबीसी: 3 वर्षांची सूट
- पीडब्ल्यूडी: 10 ते 15 वर्षांची सूट (वर्गानुसार)
निवड प्रक्रिया कशी असेल?
- SBI क्लर्क पदासाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाईल.
- प्रारंभिक परीक्षा : ही पहिली चाचणी असेल. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यात प्रवेश मिळेल.
- मुख्य परीक्षा : प्रारंभिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल.
- स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी (LPT) : मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवारांना त्यांच्या राज्याच्या स्थानिक भाषेची चाचणी द्यावी लागेल.
अधिसूचनेमध्ये काय आहे?
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. या पीडीएफमध्ये खालील महत्त्वपूर्ण माहिती आहे.
- परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम.
- राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील.
- आरक्षणासंदर्भातले नियम.
- परीक्षेच्या तारखा आणि इतर महत्त्वाचे दिशानिर्देश.
युवकांना महत्त्वाची नोकरीची संधी!
ही अधिसूचना तुम्ही SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर 'सूचना' विभागात किंवा थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकता. या संधीचा फायदा घेण्यासाठी वेळीच अर्ज करा.












Click it and Unblock the Notifications