SBI Clerk Mains Result 2025 : एसबीआय मेन परीक्षेचा निकाल कसा चेक करायचा, जाणून घ्या प्रक्रिया
SBI Clerk Mains Result 2025 Details in Marathi : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या आणि एसबीआय क्लर्कची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. काही दिवसांपूर्वीच क्लर्कची मेन परीक्षा झालेलील असून त्याचा निकाल आणि कट ऑफ गुण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कसा पाहावा याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, SBI लिपिक 2025 मुख्य निकाल आणि कट-ऑफ गुण लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असतील.

विशेष बाब म्हणजे, एसबीआय क्लर्क मेन्स परीक्षा 10 आणि 12 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आली होती, तर एसबीआय क्लर्क प्रिलिम्स परीक्षा 22, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी घेण्यात आली होती. त्याचा निकाल 28 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर क्लर्क मेन परीक्षा ही एप्रिल महिन्यात झाली. त्याचा निकाल आता येत्या काही दिवसांत कधीही लागणार आहे.
एसबीआय क्लर्क मेन्स निकाल कसा चेक करायचा?
एसबीआय क्लर्क मेन्सचा निकाल जाहीर होताच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना तो अधिकृत वेबसाइट्सवर अर्थात तपासू शकतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी sbi.co.in, sbi.co.in/web/careers/Current-openings. यावर क्लिकर करावे, या ठिकाणी त्यांना त्यांचा निकाल तपासता येणार आहे.
एसबीआय क्लर्क मेन्स निकाल 2025 : डाउनलोड कसा करायचा?
- sbi.co.in येथे अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- करिअर पोर्टल उघडा- पॉजअनम्यूट- फुलस्क्रीन
- सध्याच्या ओपनिंग्जवर क्लिक करा आणि नंतर ज्युनियर असोसिएट निकाल पृष्ठावर क्लिक करा
- तुमचे लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा
- सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
स्कोअरकार्डवर तपासण्यासाठी तपशील
- पूर्ण नाव आणि रोल नंबर
- मिळलेले गुण
- पात्रता स्थिती
- कट-ऑफ गुण
किती गुणांसाठी झाली परीक्षा, काय होता अभ्यास?
200 गुणांसाठी 190 प्रश्न होते. हे प्रश्न सामान्य/आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, परिमाणात्मक अभिरुची, तर्क क्षमता आणि संगणक अभिरुची या विषयांवर होते. परीक्षेच्या वस्तुनिष्ठ विभागात, चुकीच्या उत्तरांना नकारात्मक गुण दिले जातात, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नाला दिलेल्या गुणाच्या 1/4 भाग वजा केला जातो. परीक्षेचा एकूण कालावधी 2 तास 40 मिनिटे होता.
यावर्षी एसबीआय किती जागा भरणार?
या वर्षी, स्टेट बँक ऑफ इंडिया 13,775 ज्युनियर असोसिएट पदे भरणार आहे. अहवालांनुसार, एसबीआय क्लार्कचा प्रारंभिक पगार दरमहा 17,900 रुपये आहे, ज्यामध्ये मूळ वेतन आणि पदवीधरांना दिले जाणारे दोन आगाऊ वेतन समाविष्ट केलेले असतात.












Click it and Unblock the Notifications