Iob bank recruitment : 'या' बँकेत 400 पदं, 85 हजारांपर्यत मिळणार पगार! लवकर अर्ज भरा; आज अखेरची संधी
Sarkari naukari Iob recruitment 2025 : सरकारी नोकरी कुाला नकोय, तीही जर बँकेत असेल तर सर्वांनाच वाटते की मला संधी मिळावी, जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर एक नामी संधी तुमच्यापर्यंत चालून आलेली आहे पण वेळ खूपच कमी राहीलेला आहे, त्यामुळे तुम्हाला बँकींगमध्ये करीअर करायचे असेल तर घाई करा आणि ही बातमी वाचून लगेच अर्ज करा.
इंडियन ओव्हरसीज बँक- IOB ने देशभरातील तरुणांसाठी एक उत्तम संधी दिली आहे. बँकेने स्थानिक बँक अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती कायमस्वरूपी आणि सरकारी नोकरीची शोधणाऱ्या तरुणांसाठी खास आहे.

अर्ज करणाऱ्यांना अनुभवाची गरज नाही..
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही विशेष अनुभवाची आवश्यकता नाही, त्यामुळे पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची ही नामी संधी आहे. पदवीधर असलेल्यांनी मेहनत केल्यास आणि थोडी मेहनत जर घेतली तर बँकेतील रिकामी जागा तुमचीच असू शकते. त्यासाठी मात्र इच्छाशक्तीही महत्वाची आहे.
किती आहेत पदे आणि कुठे करायचा अर्ज?
400 बँक अधिकारी पदांसाठी भरती
- इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने देशभरातील स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या 400 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
- इच्छुक उमेदवार आज, 31 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यासाठी, बँकेच्या अधिकृत वेबसाइट iob.in ला भेट द्यावी लागेल.
महाराष्ट्रासह तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये नियुक्त्या
बँक अधिकाऱ्यांची पदं महाराष्ट्रासह तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशा सारख्या राज्यांमध्ये नियुक्त्या देण्यात येणार आहेत.
या पदांसाठी पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे?
या पदांसाठी पात्रतेचा विचार केल्यास मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे. वयाबद्दल बोलायचे झाले तर, अर्ज करण्यासाठी किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असे आहे.सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाईल.
अर्जासाठी किती शुल्क आहे?
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 850 रुपये तर एससी, एसटी आणि दिव्यांग श्रेणीसाठी 175 रुपये अर्ज शुल्क आहे.
निवड कशी केली जाईल?
- उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल, यामध्ये..
- ऑनलाइन परीक्षा - 140 प्रश्न असतील आणि वेळ 3 तास असेल.
- भाषा प्रवीणता चाचणी वैयक्तिक मुलाखत सामान्य श्रेणीसाठी 35% आणि राखीव श्रेणीसाठी 30% गुण मिळवणे आवश्यक असेल.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील.
पगार किती? सुविधा काय मिळणार?
या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹ 48,840 ते ₹ 85,920 पर्यंत पगार मिळेल. यासोबतच इतर भत्ते आणि सुविधा देखील बँकेकडून दिल्या जातील.
असा करा अर्ज?
- Iob.in वेबसाइटवर जा.
- भरती विभागात जाऊन सूचना उघडा नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- परीक्षा शुल्क भरून अर्ज पूर्ण करा.












Click it and Unblock the Notifications