Polytechnic Admission 2025:पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; मेरीट लिस्ट या तारखेला जाहीर होणार
Polytechnic Admission 2025 schedule announced : दहावीनंतर आता पुढे काय असा प्रश्न असणाऱ्यांना पाॅलिटेक्निकल हा खूपच चांगला मार्ग आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रीया सुरु झाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय तंत्रनिकेतन पदविका अर्थात पाॅलिटेक्निकसाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
20 मे ते 16 जून 2025 पर्यंत विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने दिलेल्या वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीखही 16 जून आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी 18 जून रोजी प्रसिद्ध होईल. अंतिम गुणवत्ता यादी 23 जून रोजी संकेतस्थळावर दिसेल.

(संग्रहीत फोटो..)
कुठे करणार अर्ज आणि कसा करणार?
विद्यार्थ्यांना 20 मेपासून 16 जूनपर्यंत https://poly25.dtemaharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी किंवा त्यांचे पालक अर्ज करु शकतात. याच कालावधीत कागदपत्रांची स्कॅन प्रती अपलोड करून, ती पडताळणीसाठी सादर करता येणार आहेत. ही पडताळणी ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. मात्र, ही तारीख चुकवली तर विद्यार्थ्यांना परत संधी मिळणार नाही याची काळजी पालकांनीही घ्यायला हवी.
कशी असेल प्रक्रीया?
तुम्हाला जर पाॅलिटेक्निकसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर आधी 20 मे ते 16 मे 2025 या कालावधीत तुम्हाला ऑनलाईन नोंदणी आणि तुमचे शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत.
- तुम्ही पाॅलिटेक्निकसाठी प्रवेश अर्ज भरला तर त्यानंतर डीटीईमार्फत कागदपत्र पडताळणी केली जाते.
- ही पडताळणी 16 जूनपर्यंत करता येणार आहे.
- त्यानंतर 18 जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
- यानंतर 19 ते 21 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना आपले आक्षेप नोंदवता येणार आहेत.
- अंतिम गुणवत्ता यादी 23 जून रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
समस्या आली तर काय करायचे?
जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली, अथवा फाॅर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 7669100257 किंवा 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहेत.












Click it and Unblock the Notifications