Police Bharti : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात 11 हजार पोलिसांची पदं भरणार..
Police Bharti : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केली आहे. राज्यात जवळपास 11 हजार पोलिसांच्या पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जुलै रोजी विधानभवनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना दिली आहे. त्यामुळे पोलिस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील अधिवेशनाचा आजचा अंतीम दिवस होता. या दिवशी अंतीम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली. त्यात प्रश्नोत्तर आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी अकरा हजार पोलिसांची भरती प्रक्रीया राबवली जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, यासह मागील तीन वर्षात 38 हजार आठशे दोन जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. तसंच 13 हजार 560 पोलिस पदांसाठी नवीन प्रस्ताव आणलेला आहे. हा राज्यातील पोलिस भरतीच्या इतिहासातील रेकाॅर्ड आहे, यापुर्वी राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती झाली नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
भरती प्रक्रियेला गृहविभागाकडून मान्यता
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खूप महत्त्वाची भूमिका असते आणि राज्यात वाढती लोकसंख्या पाहता आता पोलिसांची संख्या ही वाढवणे आवश्यक आहे या दृष्टीने राज्य सरकार काम करत आहे त्यामुळे पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी असून 11000 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे या संदर्भात गृह विभागात कडून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
कधी होणार पोलिस भरती?
दरम्यान पोलीस भरती ही ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू होईल असा अंदाज आहे पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
कोणत्या पदांची असेल भरती?
अकरा हजार पदांच्या भरतीमध्ये बँड्समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार आदी पदांचा समावेश आहे. उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. म्हणजेच एकाचवेळी ही परीक्षा असेल आणि एकाच पदासाठी उमेदवार प्राप्त राहील अशी प्राथमिक माहिती आहे.












Click it and Unblock the Notifications