Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NEET UG 2025 Result : NEET UG चा निकाल 'या' तारखेला लागणार? जाणून घ्या निकाल कुठे बघायचा

NEET UG 2025 Result : नीट युजी परिक्षेची अँसर की आली असून अनेक विद्यार्थी या अँसर की द्वारे आपल्या गुणांचा अंदाज लावत आहे, पण अँसर की द्वारे लावलेला अंदाज हे काही अधिकृत गुण नाहीत, अधिकृत गुणांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय चाचणी संस्था एनटीएकडून जारी होणारी गुणपत्रिकाच महत्वाची आहे, यानंतरच वैद्यकीय प्रवेशाला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच आता नीट युजीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना आहे.

देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी, NEET UG 2025 चा निकाल हा जीवनातील टर्निंग पाॅईंट ठरणारा आहे. कारण यातूनच वैद्यकीय, दंत आणि आयुष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला कलाटणी मिळू शकेल.

Neet ug 2025 result

कधी झाली होती परीक्षा?

NEET UG साठी लाखो उमेदवारांनी 4 मे रोजी परीक्षा दिली होती. आता निकाल कधी लागेल हे जाणून घेण्यासाठी सर्वांचे लक्ष NTA च्या अधिकृत वेबसाइटवर आहे. मागील वर्षांच्या पॅटर्नकडे पाहता, 14 जूनपूर्वी निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. निकाल येताच, देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

4 मे रोजी झालेल्या नीट यूजी 2025 परीक्षेसाठी 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 20.8 लाख उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला. आता सर्व उमेदवार नीट यूजी निकालाची वाट पाहत आहेत.

कुठे लागणार निकाल

4 मे रोजी झालेल्या नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल लवकरच अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर प्रसिद्ध होईल. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आधीच माहिती दिली आहे की नीट यूजी निकाल 14 जूनपर्यंत जाहीर केला जाईल. म्हणजेच, 4 मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर सुमारे 41 दिवसांनी निकाल येण्याची अपेक्षा आहे.

निकालानंतर समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल निकाल जाहीर झाल्यानंतर, यशस्वी उमेदवारांना वैद्यकीय समुपदेशनासाठी उपस्थित राहावे लागेल. यामध्ये, उमेदवारांच्या रँक आणि त्यांनी दिलेल्या महाविद्यालय आणि अभ्यासक्रमाच्या पर्यायांवर आधारित, त्यांना MBBS, BDS, BHMS, BUMS सारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळेल.

अँसर की जारी, पण कुठे बघाल? (NEET UG Answer Key)

नीट युजी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांचा अंदाज अ‍ॅन्सर की द्वारे लागू शकतो. त्यामुळे ही अ‍ॅन्सर की उमेदवार आता एनटीएची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर उत्तर की तपासू शकतात.

NEET UG 2025 Answer Key कशी तपासायची?

  • अ‍ॅन्सर की अ‍ॅक्सेस करण्यासाठी सर्वप्रथम NEET UG ची अधिकृत वेबसाइट: neet.nta.nic.in ला भेट द्या.
  • त्यानंतर NEET UG 2025 Answer Key असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून लॉग इन करा.
  • तात्पुरती उत्तर की तुमच्या OMR प्रतिसाद पत्रकासह आणि रेकॉर्ड केलेल्या प्रतिसादांसह प्रदर्शित केली जाईल.
  • अंदाजे गुणांच्या संदर्भासाठी आणि गणनासाठी कागदपत्रे डाउनलोड करा.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+