Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

NEET PG 2025 Results : ठरलं! नीट पीजीचा निकाल 'या' तारखेला लागणार! जाणून घ्या सर्व डिटेल्स

NEET PG 2025 Reults : राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परिक्षा अर्थात नीट पीजी यंदा 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12:30 या वेळेत यशस्वीरित्या पार पडली आहे. ही परीक्षा देशभरातील MD/MS आणि PG डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.आता या परिक्षेचा निकाल कधी लागणार याचीच सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून एक मोठी अपडेट आली आहे. आता लवकरच नीट परीक्षेचा निकाल लागणार आहे.

NEET PG 2025 Reults

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स म्हणजेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे की, नीट पीजीचा येत्या 3 सप्टेंबर 2025 पर्यंत निकाल लागणार आहे. त्यासोबतच कट ऑफ प्रक्रिया ही सुरू होणार आहे. देशभरातील लाखो डॉक्टर आणि मेडिकल विधान साठी आता नीट पीजी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

नीट पीजी परीक्षेद्वारे प्रत्येकवर्षी एमडी, एमएस आणि पीजी डिप्लोमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. म्हणजेच नीट परिक्षेद्वारे उमेदवार त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करतात. परीक्षा संपल्यानंतर, उमेदवारांना निकालाची प्रतिक्षा असते.

निकाल कधी आणि कुठे जाहीर होणार समजून घ्या

  • NBEMS नुसार, NEET PG 2025 चा निकाल 3 सप्टेंबर 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइट nbe.edu.in आणि natboard.edu.in वर उपलब्ध होणार आहे.
  • हा निकाल PDF स्वरूपात जाहीर केला जाईल.
  • या निकालात ज्यामध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, स्कोअर आणि ऑल इंडिया रँक (AIR) समाविष्ट असेल.
  • यासोबतच, पात्रता पर्सेंटाइल आणि कट-ऑफ देखील जाहीर केला जाईल.
  • हे विश्लेषण उमेदवारांना त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी मदत करेल आणि पुढील टप्प्यासाठी योजना तयार करण्यास उपयुक्त ठरेल.

NEET PG निकाल 2025 कसा तपासायचा?

  • प्रथम nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर जा.
  • होमपेजवरील 'NEET PG निकाल 2025' लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • निकाल PDF डाउनलोड करा आणि तुमचा रोल नंबर शोधा.
  • वैयक्तिक स्कोअरकार्ड स्वतंत्रपणे डाऊनलोड करा, ज्यामध्ये विभागवार गुण देखील असेल.

नीट पीजी निकालानंतरच्या टप्प्यांसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक

परीक्षा पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना आता पुढील टप्प्याबद्दल उत्सुकता आहे. लवकरच या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आणि संभाव्य 'आन्सर की' उपलब्ध होण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी निकालाचा अंदाज घेण्यासाठी याचा वापर करू शकतात.

  • NEET PG परीक्षेसंबंधित कोणत्याही प्रश्नासाठी किंवा मदतीसाठी, उमेदवार खालील हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात:
  • हेल्पलाइन क्रमांक: +91-7996165333 (सकाळी 09:30 ते संध्याकाळी 06:00)
  • अधिकृत वेबसाइट: https://exam.natboard.edu.in/communication.php?page=main
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+