NEET PG 2025 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच जाहीर होणार, जाणून घ्या ती स्लीप कशी डाऊनलोड करणार
NEET PG 2025 Exam City Slip News : राष्ट्रीय परीक्षा मंडळ, वैद्यकीय विज्ञान अर्थात NBEMSच्या वतीने, आज 2 जून रोजी NEET PG-2025 साठी परीक्षा शहर स्लिप जारी करणार करणार आहे. उमेदवारांच्या नोंदणीकृत मेल आयडीवर शहर स्लिप पाठली जाईल. जी स्लीप उमेदवार त्यांच्या मेलवरुन डाऊनलोड करू शकणार आहेत. दरम्यान, ही परीक्षा 15 जून रोजी देशभरातील विविध केंद्रांवर एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल, कारण सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच परीक्षा आयोजकांवर ताशेरे ओढले होते.

परीक्षा शहर स्लिपनंतर प्रवेशपत्र जारी केले जाईल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, NEET PG प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या 4 दिवस आधी जारी केले जाईल. हॉल तिकिटे NBEMS nbe.edu.in आणि natboard.edu.in च्या अधिकृत वेबसाइटवर जारी काढता येणार आहेत. जी नोंदणीकृत उमेदवार त्यांच्या अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेद्वारे डाउनलोड करू शकतील.
वैद्यकीय पीजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे CBT मोडमध्ये NEET PG परीक्षा घेतली जाते. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात.
NEET PG 2025 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे
- अधिकृत वेबसाइट nbe.edu.in ला भेट द्या.
- होम पेजवरील NEET PG 2025 प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
- आता नोंदणी क्रमांक आणि इतर तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- हॉल तिकीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- आता तपासा आणि डाउनलोड करा.
25 मार्च रोजी NBEM ने केली मोठी घोषणा
NEET PG 2025 गेल्या वर्षीप्रमाणे दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती. दरम्यान, काही उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने, NBE ला एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही परीक्षा एकाऐवजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. ही परीक्षा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 आणि दुपारी 3.30 ते संध्याकाळी 7 या वेळेत घेण्यात आली होती. परंतु, यंदा ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे.












Click it and Unblock the Notifications