MHT CET 2025 Pcb Group Result : एमएच सीईटींनतर MBBS ला नंबर लागला नाही तर हे 6 खास कोर्स तुमच्यासाठी
MHT CET 2025 Pcb Group Result top medical courses : 'एम एच सीईटी' राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेल, महाराष्ट्रतर्फे आज १७ जून रोजी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र रसायनशास्त्र (PCB) या गटाचा निकाल आज जाहीर झाला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर निकाल डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहेत. पीसीबी ग्रुपसाठी 9 ते 27 एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती.
महाराष्ट्र MHT CET 2025 परीक्षेला एकूण 7,65,335 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6,75,600 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये PCB गटातील 282,737 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात सर्वच विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले असे होत नाही. त्यातच सर्वांचा कल एमबीबीएसकडे असतो. अशावेळी बहुतांश विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या एमबीबीएस कोर्सेसला प्रवेश मिळतोच असे नाही.

दरवर्षी लाखो विद्यार्थी एमएच सीईटी परीक्षा देतात. यामध्ये अनेकजण यशस्वी होतात तर काहींना अपेक्षित यश मिळत नाही. जर तुम्हाला एमबीबीएसला प्रवेश मिळवण्याएवढे गुण मिळाले नाही तर ताण घेण्याची गरज नाही, काही असे कोर्सेस आहेत, ज्यामुळे तुम्ही डाॅक्टर बनू शकता किंवा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत कोर्सेस तुम्ही करु शकता. कारण असे अनेक उत्कृष्ट अभ्यासक्रम आहेत जे केवळ एक मजबूत करिअरच घडवू शकत नाहीत तर समाजात एक सन्माननीय ओळख देखील देऊ शकतात. या अभ्यासक्रमांची खास गोष्ट म्हणजे यामध्ये प्रवेश मिळवणे तुलनेने सोपे आहे आणि त्यामध्ये करिअरच्या संधीही वेगाने वाढत आहेत.
1. BDS: जर तुम्हाला MBBS मिळाले नसेल तर निराश होऊ नका, डेंटल सर्जरी म्हणजेच BDS हा देखील एक चांगला पर्याय आहे. हा अभ्यासक्रम 5 वर्षांचा आहे ज्यामध्ये दात आणि तोंडाशी संबंधित आजारांचा अभ्यास केला जातो. यामध्ये प्रवेशासाठी NEET पात्र असणे देखील आवश्यक आहे. एमबीबीएसला नंबर लागला नाही तर याच कोर्सला सर्वजण आधी प्राधान्य देतात.
2. बीएएमएस: आयुर्वेदात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बीएएमएस हा एक चांगला पर्याय आहे. एमबीबीएस, बीडीएसला नंबर न लागला नाही तर, या कोर्सला दुसरे प्राधान्य दिले जाते. हा 4.5 वर्षांचा कोर्स आहे आणि त्यासाठी १ वर्षाची इंटर्नशिप देखील आवश्यक आहे. यासाठी, नीट किंवा एमएच सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आणि पीसीबी विषयांसह बारावीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे
3. बी.फार्म: जर तुम्हाला औषधे आणि वैद्यकीय संशोधनात रस असेल तर बीफार्म कोर्स तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. हा चार वर्षांचा कोर्स आहे ज्यामध्ये औषधांच्या उत्पादन, संशोधन, विपणन आणि गुणवत्ता नियंत्रणाबद्दल माहिती दिली जाते. या शिवाय बी फार्म करुन मेडिकल कोडींगद्वारे आयटी सेक्टरमध्येही तुम्ही जाऊ शकता. मेडीकल कोडींगमध्ये चांगले पॅकेज मिळते, शिवाय एम. फार्म करुन तुम्ही औषधी संशोधनातही करीअर करु शकता.
4. बीपीटी: बीपीटी म्हणजेच बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना फिटनेस आणि आरोग्यामध्ये रस आहे. हा 4.5 वर्षांचा कोर्स आहे ज्यामध्ये शरीराच्या स्नायू, सांधे आणि क्रीडा दुखापतींशी संबंधित थेरपी शिकवली जाते.
5. बायोटेक्नॉलॉजी आणि बायोमेडिकल सायन्स : जर तुम्हाला संशोधन किंवा वैद्यकीय तंत्रज्ञानात करिअर करायचे असेल, तर बीएससी बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोमेडिकल सायन्ससारखे कोर्स योग्य पर्याय आहेत. यामध्ये अनुवांशिक अभियांत्रिकी, लस विकास आणि वैद्यकीय उपकरणांचा अभ्यास समाविष्ट आहे. हे कोर्सेस भारतात तसेच परदेशात खूप लोकप्रिय आहेत.
6.BSc Nursing: जर तुम्हाला लोकांची सेवा करायला आवडत असेल आणि हॉस्पिटलच्या वातावरणात काम करायचे असेल, तर BSc Nursing हा एक उत्तम पर्याय आहे. हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये रुग्णसेवा, सार्वजनिक आरोग्य आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते.












Click it and Unblock the Notifications