RTE : आरटीई प्रवेश प्रक्रिया 2026-27 सुरू; गरीब विद्यार्थ्यांना नामवंत शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश

RTE admission 2026-27 Maharashtra : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रियेला 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सुरुवात झाली आहे. शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी या संदर्भात सुधारित सूचना जारी केल्या आहेत.

RTE admission 2026-27 Maharashtra

प्रवेशाचे वेळापत्रक आणि संकेतस्थळ

बालकांच्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील मुदत देण्यात आली आहे:

  • अर्ज भरण्याचा कालावधी : १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६
  • अधिकृत संकेतस्थळ : student.maharashtra.gov.in/adm_portal

कोणाला मिळणार मोफत प्रवेश? (पात्रता)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी खालीलपैकी एका गटात असणे आवश्यक आहे:

  • गट : पात्रता : निकष
  • आर्थिक दुर्बल घटक : ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे.
  • वंचित घटक : SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, OBC, SBC आणि

सामाजिकदृष्ट्या मागास घटक

विशेष प्रवर्ग : अनाथ बालके, दिव्यांग बालके, HIV बाधित/प्रभावित बालके आणि कोविड प्रभावित बालके.

अर्ज भरताना लक्षात ठेवायच्या ५ महत्त्वाच्या गोष्टी

शाळांची निवड : पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून १ किमी हवाई अंतरावरील शाळा पोर्टलवर दिसतील. त्यापैकी जास्तीत जास्त १० शाळांची निवड विचारपूर्वक करावी.

अचूक माहिती : अर्ज भरताना नाव, जन्मतारीख आणि पत्ता यांमध्ये कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा प्रवेश रद्द होऊ शकतो.

कागदपत्रे : उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), रहिवासी पुरावा आणि बालकाचे आधार कार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

प्रवेशाचा स्तर : हा प्रवेश प्रामुख्याने इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक (Nursery/KG) स्तरावर दिला जातो.

मदत केंद्र : अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास आरटीई पोर्टलवर दिलेल्या मदत केंद्रांची (Help Centers) मदत घेता येईल.

पालकांसाठी विशेष सूचना

पालकांनी अर्जासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी. निवासी पत्ता निवडताना गुगल मॅपवरील लोकेशन अचूक असल्याची खात्री करा, कारण शाळेपासूनचे अंतर हेच प्रवेशासाठी महत्त्वाचे ठरते. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये बदल करणे कठीण जाऊ शकते, त्यामुळे माहितीची 'प्रीव्ह्यू' तपासूनच अंतिम सबमिट करावे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+