महाराष्ट्र फार्मसी प्रवेश प्रक्रिया 2025 सुरू; 'या' तारखा अतिशय महत्त्वाच्या

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET CELL) मार्फत बी. फार्मसी आणि फार्म. डी. या दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 2025-26 शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी 7 जुलैपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 14 जुलै 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

maharashtra pharmacy admission 2025

प्रवेश प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा

CET सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार:

  • 7 ते 14 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • 8 ते 15 जुलै या कालावधीत दस्तऐवज पडताळणी व अर्ज निश्चितीची प्रक्रिया होईल.
  • पडताळणी ही विद्यार्थ्याच्या निवडीप्रमाणे प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
  • 18 जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
  • यावर हरकती व सुधारणा नोंदविण्यासाठी 19 ते 21 जुलै दरम्यान वेळ देण्यात येणार आहे.
  • अंतिम गुणवत्ता यादी 23 जुलै 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.
  • महत्त्वाचे म्हणजे, 14 जुल्यानंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश CAP फेऱ्यांमध्ये केला जाणार नाही, असे CET सेलने स्पष्ट केले आहे.

प्रवेश प्रक्रियेतील अडथळे अद्याप कायम

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) ने देशभरातील फार्मसी शिक्षण संस्थांना नवीन शैक्षणिक मान्यता देण्यासाठी सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश फेऱ्यांचे संपूर्ण वेळापत्रक घोषित करण्यात आलेले नाही. केवळ अर्ज आणि नोंदणी सुरू करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही. CAP फेऱ्या जाहीर न झाल्याने प्रवेश रखडण्याची शक्यता असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

अभ्यासक्रमांची माहिती

  • बी. फार्मसी: बारावी नंतरचा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
  • फार्म. डी.: सहा वर्षांचा एकत्र पदवी अभ्यासक्रम, जो थेट शालेय शिक्षणानंतर करता येतो

प्रवेश शुल्क

सामान्य प्रवर्ग (Open Category): ₹1000

आरक्षित प्रवर्ग (Reserved Categories): ₹800

फार्मसी क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ झाला असला तरी CAP फेऱ्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रवेश पूर्णत्वास यावा, यासाठी CET सेलने तातडीने पुढील टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+