Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Board SSC Result 2025 : दहावीनंतर पुढे काय? 'हे' 5 कोर्स देतील तुम्हाला हमखास नोकरी!

Maharashtra Board SSC Result 2025 these 5courses after 10th : महाराष्ट्राच्या दहावी (एसएससी) बोर्डाचे निकाल उद्या 13 मे रोजी मंगळवारी जाहीर होणार आहे. या निकालाची प्रतिक्षा राज्यातील सुमारे सोळा लाख विद्यार्थ्यांना आहे. निकालाची तारीख घोषित झाली. उद्या निकालही लागेल पण प्रश्न हा आहे की, दहावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा...?

दहावीनंतर काय..हा प्रश्न जवळपास सर्वांनाच पडतो. अशातच काही महत्वाचे कोर्सेस असे आहेत जे तुम्हाला करता येतील आणि त्यामाध्यमातून तुम्ही चांगली नोकरी आणि चांगले वेतन मिळवू शकता. आम्ही येथे अशा पाच कोर्सेसची माहिती तुम्हाला देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करीअरचा मार्ग सापडू शकेल.

Maharashtra Board SSC Result 2025 these 5courses after 10th

दहावीनंतरचे हे पाच कोर्स (these 5courses after 10th)

1. इंजिनियरींग डिप्लोमा -

दहावीनंतर इंजिनियरींग डिप्लोमा करण्याकडे अनेकांचा कल असतो आणि हे कोर्सेस फायदेशीरही आहे. सीव्हील असो की, संगणक, अथवा इलेक्ट्राॅनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत शिक्षण घेऊन नोकरी करण्यासाठीचा हा चांगला मार्ग आहे. याशिवाय तु्म्ही पदवीच्या शिक्षणालाही प्रवेश घेऊ शकता.

2. आयटीआय -

दहावीनंतर आयटीआय हा एकदम चांगला पर्याय आहे, हा झटपट नोकरीही देतो. शिवाय नोकरी करत तुम्ही तुमचे शिक्षण सुरु ठेऊ शकता. आयटीआयपासून तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्यास वाव आहे.

3. स्टेनोग्राफी आणि टायपिंग -

दहावीनंतर स्टेनोग्राफी आणि टायपींगमध्ये डिप्लोमा करु शकता. काही राज्यात स्टेनोग्राफीचा कोर्स अकरावी किंवा बारावीनंतर देखील निवडता येतो. स्टेनोग्राफी न्यायालय आणि महत्वाच्या सरकारी कार्यालयात नोकरीची संधी देते. या संस्थांसाठी स्टेनोग्राफी आवश्यक असते. याशिवा खासगी संस्थांमध्येही तुम्हाला नोकरी मिळते.

4. काॅम्युटर हॉर्डवेअर आणि नेटवर्कींग -

आजकाल कोणत्याही कार्यालयात संगणकाशिवाय पान हलत नाही. संगणक एक दोन नव्हे तर जेवढे मनुष्यबळ तेवढे संगणक असतातच, अशातच या संगणकाची एकमेकांशी कार्यालयात कनेक्टीव्हीटीही असते त्यामुळे हार्डवेअर आणि नेटवर्कींगचा कोर्स महत्वाचा ठरतो. दहावीनंतर काॅम्युटर हॉर्डवेअर आणि नेटवर्कींगचा कोर्स तुम्हाला झटपट नोकरी देऊ शकतो. संगणक दुरुस्ती आणि नेटवर्कशी संबंधीत माहिती या कोर्सद्वारे मिळते त्यातून तुम्ही तुमचा स्वःतचा व्यवसाय करु शकता.

5. हाॅस्पीटल आणि हाॅटेल मॅनेजमेंट -

हल्ली जग बदलतेय, हाॅटेल कल्चरही वाढतेय, अशा स्थितीत हाॅटेल मॅनेजमेंटला महत्व आहे, त्यामुळे जर तुम्ही हाॅटेल मॅनेजमेंटचा दहावीनंतर डिप्लोमा करु शकता. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळते. तसेच रुग्णालयाशी संबंधित मॅनेजमेंटचा कोर्स असतो तो केला तर कुठल्याही मोठ्या रुग्णालयात नोकरी मिळते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+