Maharashtra Board Result 2025 : 10 वी 12 वीचा निकाल कधी लागणार? कुठे पाहता येणार? कसा पाहता येणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता १० व इयत्ता १२ वी चे निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. हे निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहेत. हे निकाल कसे पहायचे व निकालाची लिंक कोणती? याबाबत बोर्डाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. शिवाय हे निकाल कधी लागतील, याबाबतही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

किती विद्यार्थ्यांना प्रतिक्षा?
महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता १० वी व १२ वीची परीक्षा राज्यातील सुमारे ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्यात आली. तर इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान घेण्यात आली. त्यामुळे या दोन्ही परिक्षांचा निकाल आता लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्याच निकालाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे.
निकाल कधी व कुठे लागणार?
या दोन्ही परिक्षांचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी एसएससी बोर्डाचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला होता. त्याआधी 2019 साली 08 जूनला तर 2020 मध्ये 29 जुलैला आणि 2023 साली हा निकाल 02 जूनला लागला होता. आता बोर्ड लवकरच निकाल जाहीर करण्याची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर करणार आहे. 10 वी आणि १२ वीचे विद्यार्थी mahahsscboard.in आणि https://mahresult.nic.in/ वर त्यांची प्रोव्हिजनल मार्कशीट तपासू शकतील.
किती गुण आवश्यक ?
महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या परिक्षेत पास होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गुण आवश्यक आहेत. घेण्यात आलेल्या प्रत्येक विषयाचा पेपर हा १०० गुणांचा होता. त्यात ८० मार्क हे थेअरीसाठी व २० मार्क हे प्रॅक्टिकलसाठी होते. म्हणजेच ८० मार्काच्या थिअरी पेपरमध्ये किमान २८ गुण मिळवणे आणि २० मार्काच्या प्रॅक्टिकलमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications