JEE Mains Result 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्र टॉपर्सच्या यादीत दुस-या क्रमांकावर, यादी पहा
JEE Main Session 2 Results Out: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी रात्री उशिरा जेईई मेन सत्र-2 चा निकाल जाहीर केला. 24 उमेदवारांनी पूर्ण 100 टक्के मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. तुम्ही हा निकाल https://jeemain.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकता.
दरम्यान 18 एप्रिल रोजी एनटीएने उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली होती. या वर्षीच्या जेईई मेन सेशन 2 च्या पेपर 1 मध्ये 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के परिपूर्ण गुण मिळवले आहेत. यूआर-ऑल श्रेणीसाठी 100 ते 93.1023262 पर्यंतच्या टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांची जेईई अॅडव्हान्स्डसाठी निवड झाली आहे आणि सुमारे 97,321 उमेदवारांनी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ओलांडली आहे.

- JEE Main Session 2 Results: स्कोअरकार्ड कसा तपासायचा
- सर्वप्रथम jeemain.nta.nic.in या वेबसाइटवर जा.
- सत्र 2 निकालाची लिंक उघडा.
- तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड एंटर करा.
- निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
टॉपर्स यादीत 7 विद्यार्थी राजस्थानचे (JEE Main Session 2 Results)
टॉपर्सची यादी येथे पहा
- राजस्थान - 7
- महाराष्ट्र- 3
- तेलंगणा - 3
- उत्तर प्रदेश - 3
- पश्चिम बंगाल- 2
- दिल्ली -2
- गुजरात -2
- आंध्र प्रदेश -1
- कर्नाटक -1
-गुजरात -2
100 टक्के गुण मिळवणाऱ्या 24 विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत..
- एमडी अनस राजस्थान
- आयुष सिंघल
- आर्किस्मन नंदी
- देवदत्त माझी
- आयुष रवी चौधरी
- लक्ष्य शर्मा
- कुशाग्र गुप्ता
- हर्ष गुप्ता
- आदित प्रकाश भागडे
- दक्ष
- हर्ष झा
- रजित गुप्ता
- श्रेयस लोहिया
- सक्षम जिंदाल
- सौरव
- वंगला अजय रेड्डी
- सानिध्या सराफ
- विशाद जैन
- अर्णव सिंग
- शिवेन विकास तोष्णीवाल
- कुशाग्र बांगहा
- साई मनोगना गुठीकोंडा
- ओम प्रकाश बेहरा
- बानी ब्रता माझी
जेईई मुख्य सत्र 2 निकाल 2025: कट-ऑफ गुण (कॅटेगिरीनुसार)
- UR All: 93.1023262
- UR PWBD: 0.0079349
- EWS All: 80.3830119
- OBC All: 79.4313582
- SC All: 61.1526933
- ST All: 47.9026465












Click it and Unblock the Notifications