JEE Advanced 2025 चा निकाल आणि फायनल Answer Key जाहीर! असा तपासा तुमचा निकाल..
JEE Advanced Result 2025 Declared : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरने JEE Advanced 2025 चा निकाल जाहीर केला आहे. यासह फायनल अँसर की अर्थात अंतिम उत्तरपत्रिका देखील जाहीर झाली आहे. आता या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी- उमेदवार थेट लिंकद्वारे त्यांचा निकाल तपासू शकतात.
आज, 2 जून रोजी JEE Advanced 2025 परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिका आणि निकाल घोषित करण्यात आला आहे. या परीक्षेला बसणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट Jeeadv.ac.in ला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतली.

निकाल आणि फायनल अँसर की जाहीर (JEE Advanced 2025)
यासह त्यांना निकाल पाहण्याआधी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल, त्यानंतरच त्यांना त्यांचा निकाल तपासता येणार आहे. दरम्यान, याआधी तात्पुरत्या उत्तरपत्रिकांवरील आक्षेपांचे निवारण केल्यानंतर आता निकाल आणि अंतिम उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
कधी झाली होती JEE Advanced 2025 परीक्षा?
JEE Advanced 2025 परीक्षा 18 मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली.
यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा पार पडली.
22 मे रोजी रिस्पाॅन्सशीट जारी करण्यात आली.
तात्पुरत्या उत्तरपत्रिका 25 मे रोजी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात आली.
उमेदवारांना हा आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता, त्यानंतर फायनल अँसर की जाहीर झाली.
JEE Advanced 2025 निकाल कसा तपासायचा?
निकाल निकाल तपासण्यासाठी आम्ही काही टप्पे देत आहोत. त्याआधी एक गोष्ट समजून घ्या की,निकाल "JEE Advanced 2025 फायनल अँसर की 2025 डाऊनलोड लिंक" असा आशय लिहिलेल्या लिंकवर उमेदवार क्लिक करून आणि रोल नंबर इत्यादी तपशील प्रविष्ट करून अंतिम उत्तर की आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.
असा तपासा निकाल..
- सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाइट Jeeadv.ac.in ला भेट द्या.
- त्यानंतर होम पेजवर दिलेल्या JEE Advanced 2025 निकाल लिंकवर क्लिक करा.
- आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- तुमच्या स्क्रीनवर स्कोअरकार्ड दिसेल.
- आता तपासा आणि डाउनलोड करा.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!











Click it and Unblock the Notifications