Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Agniveer CEE result: अग्निवीरचा निकाल जाहीर: कसा चेक करायचा रिझल्ट, जे पास झाले त्यांनी काय करावे?

Indian Army CEE Result 2025 : भारतीय सैन्य दलातील अग्निवीर भरतीसाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (CEE) 2025 चा निकाल जाहीर झाला आहे. ३० जून ते १० जुलै या कालावधीत आयोजित या महत्त्वपूर्ण परीक्षेत सहभागी झालेल्या लाखो उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. ज्या उमेदवारांनी लेखी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे, त्यांना आता भरतीच्या पुढील टप्प्यांसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

निकाल पाहण्यासाठी थेट लिंक सक्रिय

भारतीय सैन्य दलाची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर अग्निवीर CEE २०२५ चा निकाल पाहण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात आली आहे. धी-धीरे सर्व पदांचे निकाल या वेबसाइटवर अपलोड केले जात आहेत. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे वेबसाइट तपासण्याचा सल्ला दिला जात आहे.

Indian Army Agniveer Result 2025

निकाल डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया:

  • सर्वात आधी भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा.
  • मुख्यपृष्ठावर 'अग्निवीर सीईई निकाल' (Agniveer CEE Result) या सेक्शनमध्ये जा.
  • तेथे तुम्हाला रोल नंबरनुसार विविध RO (रिक्रूटिंग ऑफिस)/ARO (आर्मी रिक्रूटिंग ऑफिस) नुसार पदांचे निकाल PDF स्वरूपात उपलब्ध असतील.
  • तुम्ही ज्या पदासाठी परीक्षा दिली आहे, त्यासंबंधीची PDF फाइल डाउनलोड करा.
  • डाउनलोड केलेल्या PDF मध्ये तुमचा रोल नंबर शोधण्यासाठी, 'Ctrl + F' (संगणकावर) दाबून आपला रोल नंबर टाइप करा.
  • जर तुमचा रोल नंबर यादीत असेल, तर तुम्ही पुढील टप्प्यासाठी पात्र ठरला आहात.

कोणत्या पदांसाठी घेण्यात आली होती परीक्षा?

भारतीय सैन्याने जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेड्समन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल सोसायटी असिस्टंट आणि महिला पोलीस यासह विविध पदांसाठी ही परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, पंजाबी, तेलुगु, बंगाली, उर्दू, ओडिया, मल्याळम, कन्नड, तमिळ, गुजराती, मराठी आणि आसामी यांसारख्या १३ विविध भाषांमध्ये घेण्यात आली होती.

निकालानंतर पुढील टप्पा काय?

निवड प्रक्रियेनुसार, लेखी परीक्षेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना आता पुढील टप्प्यातील चाचण्यांना सामोरे जावे लागेल. यामध्ये विविध शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्यांचा समावेश आहे.

शारीरिक आरोग्य चाचणी (PFT)

यामध्ये १.६ किलोमीटर धावणे, तसेच पुश-अप्स, सिट-अप्स आणि पुल-अप्स यांसारख्या शारीरिक कसरतींचा समावेश असेल.

शारीरिक मापन चाचणी (PMT)

या टप्प्यात उमेदवाराची उंची, वजन आणि छातीचे मोजमाप केले जाईल.

चिकित्सा परीक्षण (वैद्यकीय तपासणी)

उमेदवारांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी केली जाईल.

प्रमाणपत्र पडताळणी

उमेदवारांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, ओळखपत्र आणि लागू असल्यास श्रेणी प्रमाणपत्रे यांची पडताळणी केली जाईल.

अनुकूलता परीक्षण (लागू असल्यास)

काही विशिष्ट पदांसाठी उमेदवाराचे मानसिक मूल्यांकन करण्यासाठी मनोवैज्ञानिक चाचणी घेतली जाऊ शकते. अंतिम गुणवत्ता यादी उमेदवाराने लेखी परीक्षेत (फेज I) आणि फेज II मध्ये मिळवलेले गुण, तसेच उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येवर आधारित जाहीर केली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+