ICAI CA Result 2026: सीए इंटर आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल आज! असा बघा निकाल मेरीट लिस्ट
ICAI CA january 2026 intermediate foundation result today live updates : चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' (ICAI) द्वारे जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या CA इंटरमिजिएट (Intermediate) आणि फाउंडेशन (Foundation) परीक्षेचा निकाल आज, ८ मार्च २०२६ रोजी जाहीर होणार आहे.
आयसीएआयने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट icai.nic.in किंवा icai.org वर आपला निकाल आणि मेरिट लिस्ट पाहू शकतील.

मीडिया रिपोर्ट्स अन् सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीए इंटरमिजिएट आणि फाउंडेशनचा निकाल आज संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यापूर्वी १ मार्च रोजी जाहीर झालेला 'फायनल' परीक्षेचा निकालही याच वेळेत प्रसिद्ध करण्यात आला होता.
कसा पाहाल निकाल? (Steps to Download)
- १. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icai.nic.in ला भेट द्या.
- २. होमपेजवर 'Result' सेक्शनमध्ये "Intermediate/Foundation January 2026" या लिंकवर क्लिक करा.
- ३. तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर (किंवा पासवर्ड) प्रविष्ट करा.
- ४. स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल, तो तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी डाऊनलोड करा.
सीए 'फायनल'मध्ये कुणी मारली बाजी?
नुकत्याच जाहीर झालेल्या सीए फायनल (जानेवारी २०२६) निकालात कर्नालच्या दीक्षा गोयल हिने ४८६ गुणांसह (८१%) देशात प्रथम क्रमांक (AIR 1) पटकावला आहे. हिमाचल प्रदेशचा अनिरुद्ध गर्ग दुसऱ्या, तर दिल्लीचा ऋषभ जैन आणि सोनीपतचा ध्रुव डेंबला संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. एकूण ७,५९० उमेदवार सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
हेही वाचा : India Post GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर; 'असा' तपासा तुमचा निकाल!












Click it and Unblock the Notifications