बँकींग परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! IBPS ने पीओ ते एसओ परिक्षेचा टाईमटेबल केला जाहीर..
IBPS Revised exam calendar 2025-26 released : बँकींग परिक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आणि बँकेत नोकरीची इच्छा असलेल्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने २०२५-२६ या वर्षासाठी त्यांचे सुधारित परीक्षा कॅलेंडर जारी केले आहे.
पीओ, क्लर्क, एसओ आणि आरआरबी सारख्या आयबीपीएस परीक्षांची खूप दिवसांपासून उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते. नवीन वेळापत्रकानुसार, परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ), क्लर्क आणि स्पेशलिस्ट ऑफिसर (एसओ) सारख्या परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in ला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक तपासू शकतात.

या पदांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर
सुधारित कॅलेंडरमध्ये आयबीपीएस पीओ, क्लर्क, एसओ आणि आरआरबी (प्रादेशिक ग्रामीण बँक) च्या प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षांच्या तारखा आहेत.उमेदवारांना या तारखा लक्षात घेऊन त्यांच्या तयारीचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आयबीपीएस, पीओ २०२५ परीक्षेचे वेळापत्रक (IBPS Revised exam calendar 2025-26 released)
पूर्वपरीक्षा - १७, २३ आणि २४ ऑगस्ट २०२५
मुख्य परीक्षा - १२ ऑक्टोबर २०२५
अधिसूचना अपेक्षित तारीख - जुलै किंवा ऑगस्ट २०२५
निवड प्रक्रिया - पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत
आयबीपीएस लिपिक भरती परीक्षा
लिपिक परीक्षेची तारीख आयबीपीएस लवकरच जाहीर करेल, तथापि प्रक्रिया पीओ प्रमाणेच राहील.
IBPS SO २०२५ परीक्षेचे वेळापत्रक
पूर्वपरीक्षा : २२ आणि २३ नोव्हेंबर २०२५
मुख्य परीक्षा : ४ जानेवारी २०२६
अधिसूचना अपेक्षित तारीख : ऑगस्ट २०२५
निवड प्रक्रिया : पूर्वपरीक्षा, मुख्य आणि मुलाखत
IBPS RRB परीक्षेच्या तारखा
अधिकारी स्केल-१ पूर्वपरीक्षा : २७ जुलै, २ आणि ३ ऑगस्ट २०२५
कार्यालय सहाय्यक पूर्वपरीक्षा : ३० ऑगस्ट, ६ आणि ७ सप्टेंबर २०२५
अधिकारी स्केल - १, २, ३ मुख्य : १३ सप्टेंबर २०२५
कार्यालय सहाय्यक मुख्य: ९ नोव्हेंबर २०२५
अधिसूचना अपेक्षित तारीख : जून २०२५
(या सर्व तारखा तात्पुरत्या आहेत. गरज पडल्यास IBPS त्या बदलू शकते, म्हणून उमेदवारांनी नियमितपणे वेबसाइट तपासत राहावे.)
परिक्षेसाठी ऑनलाईन अर्जच ग्राह्य धरणार
- सर्व IBPS परीक्षांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्जासाठी फक्त एकच नोंदणी असेल नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवा, तो सर्व टप्प्यांमध्ये उपयुक्त ठरेल.
परिक्षेसाठी अर्ज शुल्क किती?
- सामान्य आणि ओबीसी उमेदवार: 850 रुपये
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवार : 175 रुपये
- शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआय द्वारे भरता येते.
अर्ज कसा करायचा?
- ibps.in वर जा आणि संबंधित भरतीवर क्लिक करा.
- तुमची वैयक्तिक माहिती आणि पात्रता प्रविष्ट करा कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा.
- तुमचा अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.
- फॉर्ममध्ये कोणतीही चूक झाल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर, तो मागे घेता येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी पात्रता अटी वाचा












Click it and Unblock the Notifications