Ibps clerk recruitment 2025:बँकींग परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी भरती, पगारही तगडा, वाचा अर्ज कसा कराल?
Ibps clerk recruitment 2025 : बँकींग परिक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने या वर्षातील क्लर्क भरतीला सुरुवात केली आहे.
२०२५ या वर्षात CRP-CSA XV साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे, ११ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये क्लर्क पदांसाठी नियुक्त्या केल्या जातील. या परिक्षांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ आहे. या परीक्षा पुर्व आणि मुख्य अशा दोन टप्प्यात होणार आहेत. पुर्व परीक्षा ऑक्टोबरमध्ये आणि मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०२५ मध्ये घेतली जाणार आहे.

देशातील ११ बँकेत लिपीक पदे भरणार
बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी असून ibps.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करता येणार आहे. ११ बँकांमध्ये लिपिक भरती या भरती मोहिमेद्वारे देशभरातील ११ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक पदे भरली जातील. निवड प्रक्रिया दोन टप्प्यात असेल, प्रिलिम्स परीक्षा आणि मुख्य परीक्षा.
IBPS CLERK post पात्रता निकष काय आहेत?
आयबीपीएस लिपिक भरतीसाठी उमेदवारांनी खालील अटी पूर्ण असाव्यात.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी.
वयोमर्यादा: १ ऑगस्ट २०२५ रोजी २० ते २८ वर्षे. (राखीव श्रेणीला नियमांनुसार सूट मिळेल) भाषा प्रवीणता: तुम्ही ज्या राज्य/केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहात त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकृत भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा (Ibps clerk recruitment 2025)
- अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्या. "CRP-Clerks XV" या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी करून नवीन वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- लॉगिन करा आणि तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि ते सुरक्षित ठेवा.
अर्ज कधी करायचा? (Ibps clerk recruitment 2025 how to apply)
अर्ज सुरू: १ ऑगस्ट २०२५ शेवटची तारीख: २१ ऑगस्ट २०२५ आयबीपीएस क्लर्क भरती २०२५ ही देशभरातील बँकिंग इच्छुकांसाठी एक उत्तम संधी आहे. म्हणून, उमेदवारांनी वेळेवर अर्ज करावा आणि योग्य स्वरूपात कागदपत्रे अपलोड करावीत.
पगार किती?
आयबीपीएस लिपिकाचा प्रारंभिक पगार पॅकेज सुमारे ४०,००० ते ४२,००० रुपये प्रति महिना आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता आणि इतर फायदे समाविष्ट आहेत.
हेही वाचा : SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 541 जागांसाठी पदभरती होणार, आजपासून भरा अर्ज, अंतीम तारीख कधी? वाचा












Click it and Unblock the Notifications