UPSC NDA I Result 2025 : युपीएससी NDA चा निकाल कसा चेक करणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
How to check the result of UPSC NDA- 1 : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी लवकरच एनडीए, एनए I परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर, परीक्षेत बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I) 2025 चा निकाल पाहू शकतात. निकालाबाबत अपडेट्स जाणून घेण्यासाठी उमेदवारांना upsconline.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

तुम्ही कसा चेक करू शकला निकाल, जाणून घ्या प्रक्रिया..!
- सर्वप्रथम तुम्हाला UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या UPSC NDA, NA I निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर निकालाची PDF उघडा.
- आता तुम्ही तुमचा रोल नंबर किंवा नाव वापरून तुमचा निकाल तपासू शकता.
निकालानंतर काय?
यूपीएससी एनडीए, एनए आय निवड प्रक्रियेत दोन टप्पे असतात, एक लेखी परीक्षा आणि दुसरी एसएसबी मुलाखत. लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी यांचा समावेश असतो.
लेखी परीक्षेत किमान कटऑफ गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या मुलाखतीत जो यशस्वी होईल त्याची अंतिम निवड झाली असे मानले जाईल.
परीक्षा कधी झाली?
यूपीएससीने 13 एप्रिल 2025 रोजी एनडीए एनए I परीक्षा 2025 घेतली. या परीक्षेत गणित आणि सामान्य क्षमता चाचणी असे दोन विषय होते.
प्रत्येक पेपरचा कालावधी 2 तास 30 मिनिटे होता. प्रश्नपत्रिकेत फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न होते. गणित आणि सामान्य क्षमता चाचणीच्या प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये सेट केल्या होत्या.
किती पदांची होणार भरती?
मिळालेल्या माहितीनुसार, यूपीएससीने 11 डिसेंबर 2024 रोजी एनडीए एनए I परीक्षा 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली, जी 1 जानेवारी 2025 पर्यंत चालली. या भरती परीक्षेद्वारे, यूपीएससीचे एनडीए एनएच्या एकूण 406 पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे.
पदांची संख्या खालीलप्रमाणे..!
यामध्ये लष्करासाठी 208 पदे (महिला उमेदवारांसाठी 10 पदांसह), नौदलासाठी 42 पदे (महिलांसाठी 6 पदांसह), हवाई दलासाठी 92- फ्लाइंग पदे (महिलांसाठी 2 पदांसह), ग्राउंड ड्युटी-टेकसाठी 18 पदे (महिलांसाठी 2 पदांसह), ग्राउंड ड्युटी-नॉन टेकसाठी 10 पदे (महिलांसाठी 2 पदांसह) आणि नेव्हल अकादमीसाठी 36 पदे (महिला अर्जदारांसाठी 5 पदांसह) यांचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications