दहावी पास उमेदरांसाठी बंपर भरती, दरमहा 70 हजारांपर्यंत पगार, पटापट अर्ज करा
Jobs in CISF: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या संधी वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. तुम्ही जर दहावी पास असाल तर तुमच्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) भरती होण्याची एक उत्तम संधी आली आहे. सीआयएसएफने 1161 कॉन्स्टेबल/ट्रेडसमॅन पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ही भरती खास दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
देशाच्या सुरक्षा सेवांमध्ये आपले करिअर घडवू इच्छिणारे तरुण यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2025 पासून सुरू होईल. इच्छुक उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

श्रेणीनुसार एकूण पदांची संख्या
या भरतीमध्ये 945 पदे पुरुष उमेदवारांसाठी 103 पदे महिलांसाठी आणि 113 पदे माजी सैनिक (ESM) साठी राखीव आहेत.
रिक्त पदांची माहिती
कॉन्स्टेबल कुक - 493 पदे
वॉशरमन (धोबी) - 262 पदे
नाई - 199 पदे
सफाई कामगार - 152 पदे
ट्रेलर - 23 पदे
सुतार - 9 पदे
मोची - 9 पदे
इलेक्ट्रिशियन - 4 पदे
माळी - 4 पदे
पेंटर - 2 पदे
एमपी अटेंडंट - 2 पदे
वेल्डर - 1 पद
चार्ज मेकॅनिक - 1 पद
पात्रता आणि वयोमर्यादा
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा: 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे.
राखीव प्रवर्गांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
पगार
निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 21,700 ते 69,100 पर्यंत पगार मिळेल.
अर्ज प्रक्रिया
अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in ला भेट द्या. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2025 पासून सुरू होईल. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट जपून ठेवा. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही भरती एक मोठी सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.












Click it and Unblock the Notifications