Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Flipkart to hire 5,000 employees: नोकरीच्या शोधात आहात? फ्लिपकार्ट करणार 5 हजार कर्मचाऱ्यांची भरती!

Flipkart to hire 5,000 employees in year 2025 : एकीकडे मायक्रोसाॅफ्ट, APPLE, GOOGLE यांच्यासारख्या कंपन्यांनी लोकांना कामावरुन काढून टाकले असतानाच आता एक गोड बातमी समोर आली आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट 2025 या वर्षात भरती करणार आहे. कंपनी आपल्या टीममध्ये तब्बल 5 हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीतील दोन प्रमुख प्लॅनपैकी हा एक प्लॅन आहे.

पाच हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीचे नियोजन कंपनीने क्विक कॉमर्स आणि फिनटेक लक्षात घेऊन केले असल्याचे वृत्त गुड रिटर्न्सने दिले आहे. याशिवाय कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) प्रकल्पांमध्येही मोठी गुंतवणूक करत आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, फ्लिपकार्टच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी सीमा नायर यांनी 26 मे रोजी झालेल्या कंपनीच्या टाउनहॉल कार्यक्रम 'फ्लिपस्टर कनेक्ट' मध्ये या भरती योजनेची माहिती दिली आहे.

Flipkart to hire 5 000 employees

या भरतीचा मोठा भाग फ्लिपकार्ट मिनिट्स (कंपनीची हायपरलोकल डिलिव्हरी सेवा) आणि सुपर.मनी (त्याचे वेगाने वाढणारे फिनटेक प्लॅटफॉर्म) यांच्याशी संबंधित भूमिकांसाठी असेल अशी माहिती कंपनीच्या सीईओंनी दिली.

फ्लिपकार्टचे ग्रुपचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, "फ्लिपकार्ट मिनिट्स खूप चांगले काम करत आहे आणि कंपनी हायपरलोकल मार्केटमध्ये मजबूत पकड निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यांनी असेही सांगितले की कंपनी सुपर.मनी वेगाने विस्तारत आहे, जी ग्राहकांना क्रेडिट आणि पेमेंट सारखी आर्थिक उत्पादने प्रदान करते. या फिनटेक व्हर्टिकलची मागणी सतत वाढत आहे आणि हे लक्षात घेऊन, नवीन भरतीद्वारे उत्पादन विकास, तंत्रज्ञान आणि व्यवसायाशी संबंधित काम मजबूत केले जाईल."

"..तरच ह लक्ष्य साध्य होईल"

कृष्णमूर्ती यांनी असेही सूचित केले आहे की, "कर्मचाऱ्यांसाठी ESOP (कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन) हा एक तरलता कार्यक्रम असू शकतो, परंतु त्यांनी असेही स्पष्ट केले की, काही विशिष्ट लक्ष्ये साध्य झाल्यासच हे शक्य होईल. कंपनीची आर्थिक कामगिरी फ्लिपकार्टवर आर्थिक कामगिरी सुधारण्यासाठी दबाव आहे."

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, कंपनीला मासिक रोख बर्न जवळजवळ अर्ध्याने कमी करण्यास सांगितले आहे, म्हणजेच $40 दशलक्ष वरून $20 दशलक्ष पर्यंत कमी करण्यास सांगितले आहे. संपूर्ण वर्षासाठी बर्न टार्गेट $250 दशलक्ष निश्चित करण्यात आले आहे. कंपनीच्या वाढीवर फ्लिपकार्ट पुर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने जूनपर्यंत ग्राहक आणि ऑर्डर व्हॉल्यूममध्ये 30 टक्के वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ही वाढ विशेषतः फॅशन सेगमेंटद्वारे प्रोत्साहन दिली जात आहे. याशिवाय, हायपरलोकल डिलिव्हरी आणि फिनटेक व्यवसाय देखील वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत असेही गुड रिटर्न्सच्या वृत्तात म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+